wuhan schools: वुहान शहरातील सर्व शाळा १ सप्टेंबरपासून उघडणार – chinas wuhan says all schools to reopen on tuesday


शांघाय: जगाला ज्या करोना संकटाने घेरलंय, त्या करोनाचा जन्म ज्या शहरात झाला त्या चीनमधील वुहान शहरातील सर्व शाळा १ सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. या शहरातील तब्बल २,८४२ शैक्षणिक संस्था येत्या मंगळवारपासून सुरू होणार आहेत.

सुमारे १ कोटी ४० लाख विद्यार्थ्यांना गेले अनेक महिने बंद असलेली शाळेची दारं पुन्हा उघडणार आहेत. येथील स्थानिक प्रशासनाने शुक्रवारी ही घोषणा केली. वुहान विद्यापीठही सोमवारी पुन्हा उघडणार आहे.

विद्यार्थ्यांनी शाळेत येताना आणि घरी जाईपर्यंत पू्र्णवेळ मास्क लावणे बंधनकारक आहे आणि शक्य असल्यास सार्वजनिक वाहतूक टाळणे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शाळांनी रोगप्रतिबंधात्मक यंत्रणा, ड्रील्स, प्रशिक्षण शिबीरे आदी उपक्रम राबवायचे आहेत. अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी शाळांनी खबरदारीचे उपाय योजायचे आहेत. जे परदेशी विद्यार्थी आहेत, विशेषत: महाविद्यालयांमध्ये त्यांना त्यांच्या शाळा, महाविद्यालयांच्या सूचनेशिवाय परतायचे नाही आहे, अशाही सूचना आहेत.

सीएस परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना ICSI चा मदतीचा हात

चीनचं हे मध्यवर्ती शहर वुहान जेथे करोनाचा उगम झाला असं समजलं जातं तिथे जानेवारीनंतर दोन महिने लॉकडाऊन होता. या शहराला करोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. वुहानमध्ये कोविड-१९ मुळे ३,८६९ मृत्यू झाले आहेत. चीनमधील एकूण करोनाबळींच्या ८० टक्के मृत्यू वुहानमध्ये झाले आहेत.

एमबीबीबीएस अभ्यासक्रमात आता महामारी व्यवस्थापन

लॉकडाऊन उठवल्यानंतर एप्रिलपासून वुहानमधील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. १८ मे पासून या शहरात करोना विषाणूच्या संसर्गाची केस रिपोर्ट झालेली नाही.

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *