Who And When Will Get The Corona Vaccine Know The Answers To All Questions | Corona Vaccine


नवी दिल्ली : ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) नं रविवारी (serum) सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि (Bharat Biotech) भारत बायोटेक यांच्या कोविशिल्ड (Covishield) आणि कोवॅक्सिन (Covaxin) या लसींच्या (coronavirus vaccine) आपातकालीन वापराला अधिकृत परवानगी देत एक मोठी घोषणा केली. त्यामुळं कोरोनाच्या लसीसंबंधिती भारतातील प्रतीक्षा खऱ्या अर्थानं संपली. पण, या घोषणेनंतर आपातकालीन वापराच्या परिभाषेपासून ते सर्वसामान्यांपर्यंत ही लस केव्हा पोहोचणार, त्यासाठीचे दर काय असणार अशा असंख्य प्रश्नांनी अनेकांच्याच मनात घर केलं. चला तर मग, जाणून घेऊया अशाच काही प्रश्नांची उत्तरं.

कधी हाती येणार कोरोनाची लस ?

सध्याच्या घडीला अनेक कोरोना लसी त्यांच्या चाचणीच्या अंतिम टप्प्यात आहेत जो टप्पा जपळपास संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. हा टप्पा ओलांडताच सरकार अधिकृतपणे लस लाँच करण्याची घोषणा करेल. यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो.

कोरोनाची वस सर्वांना एकाच वेळी दिली जाणार का?

शासनाकडे लसीची किती मात्रा उपलब्ध आहे, यावर ती देशात एकाच वेळी दिली जाणार की टप्प्याप्प्यांमध्ये याचा निर्णय घेतला जाणार आहे. कोरोना योद्ध्यांना लसीकरणाच्या कार्यक्रमात प्राधान्य देण्यात येणार आहे. ज्यामध्ये आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांचा समावेश आहे. तर, त्यापुढील टप्प्यात 50 वर्षे आणि त्यावरील वयोगटात येणाऱ्यांना लस देण्यात येणार आहे.

लस घेणं सर्वांसाधी बंधनकारक आहे का?

कोरोनाची लस घेणं बंधनकारक नसलं करीही, देशातील जबाबदा नागरिक म्हणून प्रत्येकानंच ही लस घ्यावी. लसीची निर्धारित मात्रा घेत हे सत्र पूर्ण करणं हे मात्र महत्त्वाचं.

लस सुरक्षित आहे का?

सुरक्षितता आणि लसीचा प्रभाव या निकषांची तपासणी केल्यानंतरच लसीच्या वापराला देशात अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळं या लसी पूर्णपणे सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं आहे.

सध्याच्या सर्व कोरोनाबाधितांना दिली जाणार कोरोना लस?

कोरोनाबाधितांना विषाणुची लागण झालेली असतानाच लस देण्यामुळं केंद्रावरही संक्रमणाचं संकट ओढावू शकतं. त्यामुळं 14 दिवसांच्या कालावधीसाठी त्यांना लसीपासून दूर ठेवावं.

कोरोनावर मात केलेल्यांसाठी लस महत्त्वाची आहे का?

ज्यांना कोरोना होऊन गेला आहे, अशांनी कोरोनाची लस घ्यावी. ज्यामुळं त्यांची रोगप्रतिकारक शक्ती आणखी वाढेल.

कोरोना लस मिळविण्यासाठी Co-WIN अ‍ॅप आवश्यक, डाउनलोड आणि नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

भारतातील लस इतर देशातील लसींइतकीच प्रभावी आहे का?

होय. इतर देशांप्रमाणंच भारतातील लसीही तितक्याच प्रभावी आणि सुरक्षितही आहेत. लसीला मान्यता मिळण्यापूर्वी सर्वच निकषांचा अभ्यास आणि निरिक्षण केलं गेलं आहे.

सध्याच्या घडीला देशात किली डोस तयार?

सीरमकडे सध्या लसीचे 50 मिलियन डोस तयार आहेत. जे 25 मिनियन नागरिकांना देण्यात येणार आहेत.

कोरोनाच्या नव्या प्रकारावर लस प्रभावी ठरणार का?

सीरमच्या म्हणण्यानुसार ही लस कोरोनाच्या नव्या प्रकारच्या संक्रमणावरही प्रभावी ठरणार आहे. संशोधकांच्या मते विषाणुमध्ये फार कमी प्रमाणातच बदल झाले आहेत, त्यामुळं ही लस या नव्या प्रकारावरही प्रभावी ठरेल.

कोरोनाची लस मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध होणार का?

मार्च किंवा एप्रिल महिन्यापर्यंत वॅक्सिन खासगी स्वरुपात मिळण्यास सुरुवात होईल. पण, ती कोणा एका डॉक्टरमार्फतच तुम्हाला मिळू शकेल. त्यांच्या सल्ल्यानुसारच लस दिली जाणार आहे. ही लस मेडिकल स्टोअरमध्ये तुर्तास उपबल्ध होण्याची शक्यता कमी आहे.

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *