UPSC Mains Result: यूपीएससी मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर2020: केंद्रीय लोकसेवा आयोगाने () मंगळवारी नागरी सेवा (मुख्य) परीक्षा २०२० चे निकाल जाहीर केले. या परीक्षेत यशस्वी ठरलेल्या उमेदवारांच्या व्यक्तिमत्व चाचण्या लवकरच सुरू होणार आहेत.

या मुलाखती यूपीएससीच्या नवी दिल्लीतील धोलपूर हाऊस, शहाजहान मार्ग येथील कार्यालयात होतील. या उमेदवारांना व्यक्तिमत्व चाचणीवेळी (मुलाखत) आपले वय, शैक्षणिक पात्रता, सामाजिक प्रवर्ग प्रमाणपत्रे, आर्थिक दुर्बल गट तसेच विकलांग प्रमाणपत्रे आणि अन्य कागदपत्रे सादर करावी लागतील. त्यामुळे ही कागदपत्रे तयार ठेवावीत, असे कार्मिक मंत्रालयाने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

व्यक्तिमत्व चाचणीसाठीही ई-समन्स पत्रे लवकरच उपलब्ध केली जाणार असून, ती www.upsc.gov.in आणि www.upsconline.in या संकेतस्थळांवरून डाउनलोड करता येतील. यासाठी कागदी पत्रे दिली जाणार नाहीत.

हेही वाचा:


Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *