upsc ifs main exam 2020: भारतीय वन सेवा (IFS) च्या मुख्य परीक्षेसाठी DAF-1 अर्ज जारी – upsc ifs main 2020 daf – 1 available, please check on upsc gov in


UPSC IFS Main 2020: केंद्रीय लोकसेवा आयोगाने भारतीय वन सेवा (IFS) च्या मुख्य परीक्षेसाठी डिटेल्ड अॅप्लिकेशन फॉर्म DAF – 1 अधिकृत संकेतस्थळावर जारी केला आहे. upsc.gov.in वर उमेदवारांना DAF-1 भरता येईल. हा अर्ज भरण्याची अखेरची मुदत २७ नोव्हेंबर २०२० आहे.

शेड्युलनुसार यूपीएससी २८ फेब्रुवारी २०२१ ते ७ मार्च २०२१ पर्यंत भारतीय वन सेवा मुख्य परीक्षा (IFS Main Exam 2020) देशभरात विविध परीक्षा केंद्रांवर आयोजित करणार आहे. IFS मेन परीक्षेद्वारे भारतीय वन सेवेतील भरतीसाठी विविध रिक्त जागांवर उमेदवारांची निवड केली जाईल. लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे अंतिम उमेदवार निवडले जातील.

UPSC IFS main 2020: असा भरा DAF-I अॅप्लिकेशन फॉर्म
– सर्वात आधी अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in वर जा.
– यानंतर होम पेजवर ‘DAF for VARIOUS EXAMINATIONS OF UPSC’ च्या लिंक पर क्लिक करा.
– यानंतर ‘Click here’ च्या लिंक वर क्लिक करा.
– आता इंडियन फॉरेस्ट सर्विस मुख्य परीक्षा 2020 च्या लिंक वर क्लिक करा.
– आता आपला लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाका.
– UPSC IFS मुख्य 2020 साठी DAF भरा.
– यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.

अर्ज शुल्क

भारतीय वन सेवा मुख्य परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी एसबीआयच्या कोणत्याही शाखेत कॅश पैसे जमा करावे लागतील किंवा एसबीआयच्या नेट बँकिंग सुविधेचा वापर करून व्हिसा / मास्टर कार्ड / Rupay क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डाचा वापर करून २०० रुपये शुल्क जमा करावयाचे आहे.

UPSC IFS Main 2020: अॅडमिट कार्ड कधी?

परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड आणि वेळापत्रक परीक्षा सुरू होण्याआधी किमान सुमारे ३ आठवडे आधी संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जातील.

AISSEE 2021: सैनिक स्कूल परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय तटरक्षक दलात भरती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
%d bloggers like this: