upsc cms result 2020: UPSC कंबाइंड मेडिकल सर्व्हिसेस लेखी परीक्षेचा निकाल जाहीर – upsc cms result 2020 upsc released combined medical service exam result


UPSC CMS result 2020केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या कंबाइंड मेडिकल सर्व्हिसेस परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यूपीएससीची अधिकृत बेवसाइट upsc.gov.in वर या निकालाची घोषणा करण्यात आली आहे आणि गुणवत्ता यादीही जाहीर करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली असेल ते मुलाखतीत सहभाग घेऊ शकतील.

UPSC ने आपल्या वेबसाइटवर जारी केलेल्या नोटिफिकेशनमध्ये लिहिलंय की ‘उमेदवारांनी मुलाखतीदरम्यान आपले वय, शैक्षणिक पात्रता, शारीरिक विकलांगता असल्यास त्याबाबतची संबंधित प्रमाणपत्रे जमा करायची आहेत.’

जे उमेदवार मुलाखतीत सहभागी होणार आहेत, त्यांना एक डिटेल्ड अॅप्लिकेशन फॉर्म (DAF) भरून जमा करावयाचा आहे. DAF भरण्याची मुदत २४ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर पर्यंत आहे. मुलाखतींचे सविस्तर शेड्युल नंतर जारी करण्यात येईल असे यूपीएससीने कळवले आहे.

यूपीएससीने नोटिफिकेशनमध्ये सांगितले की ज्या उमेदवारांनी परीक्षा उत्तीर्ण केलेली नाही, त्यांची मार्कशीट आयोगाच्या वेबसाइटवर अंतिम निकालानंतर प्रसिद्ध केली जाईल.

SBI PO 2000: पदवीधर उमदेवारांना संधी; एसबीआयमध्ये भरती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
%d bloggers like this: