UPSC CMS 2021 exam: UPSC Jobs 2021: कंबाइंड मेडिकल सर्विस परीक्षा नोटिफिकेशन; बदलली ही तारीख – upsc cms 2021 exam notification delayed amid covid19


हायलाइट्स:

  • यूपीएससीने दिली मेडिकल सर्व्हिसेस एक्झाम २०२१ ची माहिती
  • ५ मे रोजी येणार होते नोटिफिकेशन
  • upsc.gov.in वर जारी झाली नोटीस

UPSC CMS 2021 Notification: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने कंबाइंड मेडिकल सर्व्हिसेस एक्झाम २०२१ नोटिफिकेशनची माहिती दिली आहे. आयोगाने अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर यूपीएससी सीएमएस एक्झाम २०२१ चे अपडेट जारी केले आहे.

कंबाइंड मेडिकल सर्व्हिसेस एक्झाम २०२१ (UPSC CMS Exam 2021) चे नोटिफिकेशन ५ मे २०२१ रोजी जारी केले जाणार होते. पण आता ही तारीख बदलण्यात आली आहे. आयोगाने सांगितले आहे की नोटिफिकेशन पुढील आदेशानंतर जारी केले जाईल.

केंद्र सरकारी भरती करणाऱ्या लोक सेवा आयोगाने सांगितले आहे की नोटिफिकेशन जारी होण्याची नवी तारीख लवकरच जारी करण्यात येईल. जे उमेदवार यूपीएससी सीएमएस परीक्षा २०२१ साठी अर्ज करू इच्छितात त्यांनी आयोगाची वेबसाइट upsc.gov.in ला भेट द्यावी. अर्ज upsconline.nic.in द्वारे केले जाणार आहेत.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने करोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मे २०२१ मधील सर्व ऑफलाइन परीक्षा स्थगित करण्याचे आवाहन केले आहे.

CMS Exam 2021 संबंधीची UPSC ची नोटिस वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

JEE Main: जेईई मेन २०२१ मे सत्राची परीक्षाही लांबणीवर
NIOS 10th, 12th Results 2021: दहावी, बारावीचे निकाल जाहीर

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *