ugc net result 2020: UGC NET 2020 परीक्षेचा निकाल जाहीर – ugc net 2020 result announced by nta


UGC NET 2020: विद्यापीठ अनुदान आयोगाची राष्ट्रीय पात्रता परीक्षा (UGC NET 2020) जून २०२० परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. कोविड – १९ मुळे ही परीक्षा स्थगित होऊन सप्टेंबर-नोव्हेंबर २०२० मध्ये आयोजित करण्यात आली होती. आता नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) ने अधिकृत संकेतस्थळावर निकाल जाहीर केला आहे.

निकाल पुढीलपैकी कोणत्याही एका संकेतस्थळावर पाहता येईल –

ugcnet.nta.nic.in
nta.ac.in
ntaresults.nic.in

एकूण ५ लाख २६ हजार ७०७ उमेदवारांनी ही परीक्षा दिली. ८१ विविध विषयांसाठी परीक्षा झाली. सर्व उमेदवारी आपला निकाल संकेतस्थळावर पाहू शकतात. निकालाची थेट लिंकही या वृत्ताच्या अखेरीस देण्यात आली आहे.

कसा पाहाल निकाल?

निकाल पाहण्यासाठी तुम्ही पुढे दिलेल्या यूजीसी नेट रिझल्ट डायरेक्ट लिंक (UGC NET Result Direct Link) वर क्लिक करा. नवं पेज उघडेल. तेथे आपला अॅप्लिकेशन क्रमांक, जन्मतारीख आणि सिक्युरिटी पिन टाकून सबमीट करा. तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. तो डाऊनलोड करा.

थेट लिंकद्वारे UGC NET Result 2020 पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
UGC NET 2020 परीक्षेची अंतिम उत्तरतालिका जाहीर

अंतिम उत्तर तालिका

एनटीएने सोमवार ३० नोव्हेंबर २०२० रोजी यूजीसी नेटच्या सर्व ८१ विषयांची अंतिम उत्तरतालिका जाहीर केली होती. या आधारे निकाल तयार केला गेला.
अंतिम उत्तरतालिका पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

CTET Exam: पुढील वर्षी होणार सीटीईटी परीक्षा; नवी तारीख आली

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *