teachers covid positive : शेकडो शिक्षक करोना संक्रमित; शाळेत न बोलावण्याची संघटनांची मागणी – hundreds of teachers in maharashtra are covid 19 positive


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

राज्यात सोमवापासून शाळा सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या करोना चाचण्या करण्यात येत होत्या. यामध्ये राज्यातील शेकडो शिक्षक करोना संक्रमित असल्याचे समजत आहे. मुंबई, ठाणे येथे विद्यार्थ्यांना शाळेत बोलावणार नसले, तरी शिक्षकांना मात्र शाळेत बोलावणार आहेत. मात्र अनेक शिक्षकांना करोनाची बाधा झाल्याच्या पार्श्वभूमीवर, शिक्षकांनाही शाळेत न बोलवता त्यांना ऑनलाइन अध्यापन करू द्यावे, अशी मागणी शिक्षक संघटना करत आहेत.

सोमवारपासून राज्यात नववी, दहावी व बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र पालक, शिक्षकांचा वाढता दबाव लक्षात घेता, हा निर्णय राज्य सरकारने स्थानिक प्रशासनावर सोडला. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर येथे शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र काही भागात शाळा सुरू होत आहेत. दुसरीकडे, काही भागात विद्यार्थ्यांसाठी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासानाने घेतला असला, तरी ५० टक्के उपस्थितीच्या नियमांनुसार शिक्षकांना शाळेत बोलविले जाणार आहे.

नुकत्याच झालेल्या शिक्षकांच्या करोना चाचणीमध्ये नाशिक येथे ३४, कोल्हापूर १७, बीड २५, नांदेड ११, उस्मानाबाद ४७, नागपूर ४१,अकोला ६२, यवतमाळ १४, वर्धा २४ आणि औरंगाबाद ७२ इतके शिक्षक करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सातारा जिल्ह्यात आठ हजार ७९० शिक्षकांची अँटिजेन तपासणी झाली. त्यामध्ये ५० शिक्षकांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथील आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नसली, तरी येथेही काही शिक्षक पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच अनेकांचे चाचणी अहवाल अद्याप येणे बाकी आहेत. यामुळे आता शिक्षकांना शाळेत न बोलावता ऑनलाइनच अध्यापन करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी शिक्षक परिषदेने केली आहे.

पुणे शहरातील शाळा बंदच राहणार; ग्रामीण भागात शाळा सुरू होणार

१००हून अधिक शिक्षकांचा मृत्यू

सतत सर्वेक्षणे, करोना ड्युटी यामुळे १०० हून अधिक शिक्षकांचा मृत्यू झाला असून शेकडो शिक्षक या आधीही करोना संक्रमित होऊन बरे झाले आहेत. आता तरी करोना ड्युटीमधून शिक्षकांना सूट मिळावी, त्यांची वैद्यकीय बिले मंजूर करावीत. तसेच शाळेत बोलावू नये, अशी मागणी परिषदेने केल्याचे मुंबई विभागाचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी सांगितले.

मुंबईप्रमाणेच ठाणे, नवी मुंबईतही शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदचLeave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
%d bloggers like this: