success of finding 36 genes related to heart disease | हृदयविकाराशी संबंधित ३६ जनुके शोधण्यात यश

वैज्ञानिकांनी हृदयविकाराच्या झटक्याशी संबंधित ३६ नवी जनुके शोधून काढली आहेत. त्यामुळे व्यक्तिगत पातळीवर औषध योजना शक्य होणार आहे. अमेरिकेतील नॉर्थइस्टर्न विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे की, हृदयाच्या स्नायूंच्या भित्तिका जाड होण्यामागे जनुकांची भूमिका महत्त्वाची असते. अ‍ॅलेन कर्मा यांनी या संशोधनाबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, हृदयविकाराशी संबंधित जनुके ओळखता आल्याने व्यक्तिगत पातळीवर औषधे तयार करता येणे शक्य आहे. त्यातून हृदयविकाराला तो होण्याआधीच प्रतिबंध करता येईल, यात औषधाला रुग्णाचा प्रतिसाद कितपत असेल याचाही उलगडा आधीच करता येतो. असे यातील सहभागी संशोधक मार्क सांतोलिनी यांनी म्हटले आहे. केवळ रक्ताची एक चाचणी करूनही यात योग्य औषध ठरवता येते. अत्यंत ठणठणीत आरोग्य असलेल्या काही व्यक्ती अचानक हृदयविकाराने मरतात. अशा व्यक्तींनी दान केलेल्या हृदयाच्या मदतीने हे संशोधन करण्यात आले. त्यात संदेशवाहक आरएनएचे विश्लेषण करण्यात आले. कर्मा यांच्या मते या पद्धतीत हृदयविकाराशी संबंधित सर्वच जनुके सापडलेली नाहीत. उंदरातील १०० जनुकांचा अभ्यास करून यात विश्लेषण करण्यात आले. आता शोधण्यात आलेल्या एका जनुकाचे नामकरण आरएफएफएल असे करण्यात आले आहे. त्याचा हृदयविकाराशी संबंध आहे. यात औषधांमुळे जनुकांच्या आविष्करणात फरक पडत असतो.

 

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *