ssc hsc exams 2021: दहावी, बारावी परीक्षा ऑफलाइनच; बोर्डाचे स्पष्टीकरण – ssc hsc exams 2021 will be conducted offline mode, clarifies maharashtra board


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

राज्यातील करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, पुन्हा लॉकडाउन होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे दहावी व बारावीच्या परीक्षा होणार की, नाही याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात किंवा ऑनलाइन घेण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होऊ लागली आहे. मात्र, तसा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही. यामुळे परीक्षा ऑफलाइनच होतील, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी स्पष्ट केले.

राज्यात वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही भागांमध्ये ‘नाइट कर्फ्यू’ लावण्यात आला आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास लॉकडाउनची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये जाहीर केलेल्या दहावी, बारावीच्या परीक्षांवरही करोनाचे पुन्हा सावट आले आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात यावी किंवा ऑनलाइन घेण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी व पालकांकडून शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे ट्विटर मार्फत करण्यात येत आहे.

वाढत्या करोनामध्ये प्रत्यक्षात परीक्षा घेतल्यास आमच्या मुलांचा जीव धोक्यात घातला जाऊ शकतो. अनेक शाळांमध्ये व परीक्षा केंद्रावर पुरेशा सुरक्षा व्यवस्था नाही त्यामुळे ऑफलाइन परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आमच्या मुलांच्या जिवाची काळजी घेऊन दहावी व बारावीच्या परीक्षा ऑनलाइन घेण्यात यावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात आली आहे. तर काही विद्यार्थी व पालकांनी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी विनंती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना ट्विटरवरून केली आहे.

सध्या मंडळाकडे ऑनलाइन परीक्षेचा कोणताही प्रस्ताव नाही. यामुळे नियोजित वेळापत्रकानुसार ऑफलाइन परीक्षांचे नियोजन सुरू आहे. विद्यार्थ्यांनी कोणताही संभ्रम न ठेवता परीक्षेची तयारी करावी.

दिनकर पाटील, अध्यक्ष, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

#Reducemoresyllabus मोहीम

परीक्षाच घ्यायची असेल, तर आम्हाला प्रश्नसंच देण्यात यावे, अशी मागणीही काही विद्यार्थ्यांनी केली आहे. याबरोबरच अभ्याक्रमात अधिक कपात करण्यात यावी, अशी मागणीही विद्यार्थी व पालकांकडून होऊ लागली आहे. त्यासाठी काही विद्यार्थ्यानी सोशल मीडियावर #Reducemoresyllabus ही मोहीम सुरू केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या भविष्याचा, हिताचा विचार करून अभ्यासक्रम कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून वर्षा गायकवाड यांना विनंती करण्यात आली आहे.

संचारबंदीमुळे अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित
निकृष्ठ जेवणाविरोधात विद्यार्थ्यांच्या मोर्चाने कापले १२ कि.मी. अंतर
करोनाबाधित रुग्णसंख्या वाढ: पुण्यातील शाळा, महाविद्यालये २८ फेब्रुवारीपर्यंत बंद

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *