ssc hsc exam via online mode: दहावी, बारावी परीक्षा ऑनलाइन घ्या; मागणीसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन – students demand to conduct ssc hsc exam via online mode


म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात; तसेच ‘इंटर्नल’ आणि ‘एक्सटर्नल’ यांच्या गुणांचे प्रमाण सारखे असावे, अशा प्रमुख मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी शनिवारवाड्यासमोर आंदोलन केले. या आंदोलनात पालकदेखील सहभागी झाले होते. त्यामुळे झालेल्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले.

विद्यार्थ्यांनी त्यांच्या मागणीचे निवेदन माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक दत्तात्रय जगताप यांना दिले. संपूर्ण शैक्षणिक वर्ष ऑनलाइन पद्धतीने असल्याने, संपूर्ण अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने शिकवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत राज्य मंडळाने ऑफलाइन पद्धतीने परीक्षा न घेता, त्या ऑनलाइन पद्धतीने घेतल्या पाहिजे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. करोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता, विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेण्यात अनेक अडचणी आल्या आहेत. त्यामुळे या परीक्षा घेताना राज्य मंडळाने इंटर्नल आणि एक्स्टर्नल यांत गुणांचे प्रमाण सारखे असावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनी आपल्या मागणीसाठी हातात फलक घेत घोषणा दिल्या. या वेळी आंदोलनात विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालक सहभागी झाले होते. आंदोलनाची वाढणारी तीव्रता लक्षात घेऊन, पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोनल गुंडाळले.

‘तीस टक्के शुल्कमाफी द्या’

करोनामुळे विद्यार्थी शाळेत किंवा ज्युनिअर कॉलेजांमध्ये गेले नसतानाही, त्यांच्याकडून संपूर्ण शुल्क घेण्यात येत आहे. या परिस्थितीत ३० टक्के शुल्क माफ करावे. एका विषयाच्या पेपरनंतर पाच ते सहा दिवसांच्या सुट्ट्या द्याव्यात, अशा मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या.
SSC HSC Exam: बुरखा, स्कार्फ घालून परीक्षा देण्याची परवानगी देण्याची मागणी

दहावी, बारावी अभ्यासक्रमात ५० टक्के कपात अशक्य: शिक्षणमंत्री

गॅस सिलिंडर वाटून मुलीला केले ‘सीए’; नाशिकच्या जगवाणी कुटुंबाची यशोगाथा

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *