ssc hsc exam 2021: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विषयनिहाय तासिका – ssc hsc exam 2021 preparation, lectures on dd sahyadri


हायलाइट्स:

  • दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विषयनिहाय तासिका
  • दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर या तासिका
  • विषयनिहाय संपूर्ण वेळापत्रकाची थेट लिंक या वृत्तात

SSC HSC Exam Preparation: शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा विषयनिहाय तासिकांचे आयोजन केले आहे. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर सोमवार १५ मार्चपासून या तासिका प्रसारित केल्या जाणार आहेत.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. त्यांनी असे ट्विट केले आहे की शालेय शिक्षण विभागातर्फे इ. १० वी व इ. १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी पुनश्च एकदा विषयनिहाय तासिकांचे आयोजन डी. डी. सह्याद्री वाहिनीवर दि.१५ मार्च २०२१ पासून सुरू होत आहे.

दररोज दुपारी १२.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत या तासिका होणार आहेत. सोमवारी दुपारी १२.३० ते १ दहावीची आणि दुपारी २.३० ते ३.३० बारावीची तासिका होईल. मंगळवार ते शुक्रवार दुपारी १२.३० ते १ आणि दुपारी १.३० ते २ या वेळेत बारावीची तासिका होईल. विषयनिहाय संपूर्ण वेळापत्रकाची थेट लिंक या वृत्तात पुढे देण्यात आली आहे.
दहावी आणि बारावीसाठी डीडी वाहिनीवर सुरू झालेल्या तासिकांच्या वेळापत्रकासाठी येथे क्लिक करा.

वी कॅन डू इट ऑफलाइन एक्झाम
दरम्यान, राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरक्षित वातावरणात घेण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये, यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन राज्यभर समान स्तरावर ऑफलाइन पद्धतीने परीक्षा देण्यासाठी सज्ज होताना, ‘वी कॅन डू इट ऑफलाइन एक्झाम’ (We Can Do It Offline Exam) ही मोहीम राज्यभर राबविण्यात येणार आहे. शिवाय विद्यार्थ्यांना सामान्यत: पडणाऱ्या प्रश्नांबाबत वेबसाइटवर लवकरच ‘एफएक्यू’ देण्यात येणार आहेत.

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *