ssc exam 2021: दहावी परीक्षा अर्ज भरण्यास २५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ – ssc exam 2021 application date extended by maharashtra ssc board


SSC Exam 2021 Update: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रक प्रमाणे २५ जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. यापूर्वीची मुदत सोमवारी ११ जानेवारी रोजी संपत होती.

नोंदणी कुठे करायची?

राज्य मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ www.mahahsscboard.in यावर विद्यार्थी माध्यमिक शाळांमार्फत नोंदणी करू शकतात.

या तारखांव्यतिरिक्त बोर्डाने परिपत्रकात आणखी महत्त्वाची माहिती दिली आहे. ऑनलाइन नोंदणी करताना विद्यार्थ्यांची अद्ययावत नोंद असणे आवश्यक आहे. त्यासाठी Saral Data वरूनच नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज भरायचे आहेत, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे. तसेच यावर्षी नव्याने फॉर्म १७ द्वारे नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची २०२१ मधील परीक्षेसाठी अ्ज भरण्याचा कालावधी स्वतंत्रपणे निश्चित केला जाणार आहे, त्यामुळे या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरण्यात येऊ नयेत, असेही बोर्डाने कळवले आहे.

महत्त्वाच्या तारखा

नियमित विद्यार्थ्यांचे नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत – १२ जानेवारी २०२१ ते २५ जानेवारी २०२१

पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत – १२ जानेवारी २०२१ ते २५ जानेवारी २०२१

माध्यमिक शाळांनी चलन डाऊनलोड करून त्याद्वारे बँकेत शुल्क भरण्याची मुदत – १२ जानेवारी २०२१ ते १ फेब्रुवारी २०२१

माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या आणि प्रि-लिस्ट जमा करण्याची मुदत – ४ फेब्रुवारी २०२१

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा

दहावी एप्रिल/मे २०२१ परीक्षा अर्जांच्या मुदतवाढीसंदर्भातील परिपत्रक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा: शाळा शुल्कासाठी अडवणूक सुरूच; दहावी-बारावी अर्ज भरताना पालकांसमोर अडचणी

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *