हायलाइट्स:
- अभिनेता सोनू सूद गरजवंतांसाठी पुन्हा एकदा आला धावून
- सोनू सूद देणार १ लाख बेरोजगारांना रोजगार
- ट्विटरवरून केलं जाहीर
- १० कोटी लोकांचं आयुष्य बदलण्याची योजना
त्याने केलेल्या ट्विटमध्ये असं लिहिलंय की त्यांनी सुमारे १० कोटी लोकांचं आयुष्य बदलण्याची योजना आहे. यासाठी तो एक लाख लोकांच्या नोकरीची व्यवस्था करणार आहे. हे काम अर्थात टप्प्प्याटप्प्याने केलं जाणार आहे. पुढील पाच वर्षांच्या आत सुमारे १० कोटी लोकांचे आयुष्य बदलण्याच्या योजनेवर काम करत असल्याचं सोनू सूदनं जाहीर केलं ाहे.
यासाठी त्याने एक अॅप तयार केला आहे. या अॅपची माहिती देत तो डाऊनलोड करण्याचं आवाहन त्यानं केलं आहे. तो लिहितो – नया साल, नई उम्मीदें
नई नौकरी के अवसर….
और उन अवसरों को आपके करीब लाते, नए हम।
प्रवासी रोज़गार अब है गुडवर्कर।
आज ही गुडवर्कर एप्लिकेशन को डाउनलोड करें और बेहतर कल की उम्मीद करें
लॉकडाऊनच्या काळात अभिनेता सोनू सूद गरीबांचा मसीहा म्हणून ओळखला जाऊ लागला. हजारो गरीब मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी सोनुनं मदत केली होती.
सोनू सूद याचं ट्विट पुढीलप्रमाणे –
लोकांनी सोनूच्या या आवाहनलाना भरभरून प्रतिसाद दिला आहे.