हायलाइट्स:
- गौ विज्ञानावरील परीक्षा रद्द करा
- केरळच्या शास्त्र साहित्य परिषदेची मागणी
- अंधश्रद्धा पसरवण्याचा आणि देशातील शिक्षण क्षेत्राचे भगवीकरण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप
गौ-विज्ञानाबाबत राष्ट्रीय पातळीवर होणारी ऑनलाइन परीक्षा रद्द करण्याची मागणी केरळच्या शास्त्र साहित्य परिषदेने केली आहे. अंधश्रद्धा पसरवण्याचा आणि देशातील शिक्षण क्षेत्राचे भगवीकरण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नागरिकांची विज्ञान चळवळ म्हणून ओळख असलेल्या या परिषदेने गौ विज्ञानाबाबत विरोधाची थेट भूमिका घेतली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने नुकतीच राष्ट्रीय कामधेनू आयोगाची स्थापना करून त्या अभ्यासाला उत्तेजन देण्याचा प्रयत्न करण्याची घोषणा केली. त्यासाठी विद्यार्थ्यांची परीक्षाही घेण्यात येणार आहे. मात्र, सरकारच्या या प्रयत्नांना प्रतिसाद देऊ नये, असे परिषदेने म्हटले आहे. ५ जानेवारीला केंद्र सरकारने याबाबत घोषणा केली होती. विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना देशी गाय आणि त्यापासून मिळणाऱ्या लाभाची माहिती व्हावी, या विषयाबाबत रुची उत्पन्न करण्याच्यादृष्टीने २५ फेब्रुवारीला सरकारकडून गौ विज्ञान परीक्षा घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. आयोगाचा हा निर्णय निषेधार्ह आणि धक्कादायक आहे. अवैज्ञानिक आणि मूर्खपणावर आधारित विषयावर परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना त्याकडे ढकलण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप परिषदेकडून करण्यात आला आहे.
परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्या: यूजीसी
‘राष्ट्रीय कामधेनू आयोगामार्फत २५ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘कामधेनू गो विज्ञान प्रचार-प्रसार परीक्षे’ला (Gau Vigyan Pariksha) बसण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे,’ असे पत्र विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व विद्यापीठांना पाठविले आहे. या परीक्षेत गो-विज्ञानाबद्दल विविध प्रश्न विचारले जाणार असून ही परीक्षा सर्वांसाठी खुली असणार आहे.
गो-विज्ञान परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्या; यूजीसीचे विद्यापीठांना निर्देश
दहावीची परीक्षा ऑनलाइन? वाढत्या करोना प्रादुर्भावामुळे चर्चांना उधाण