Schools reopening in Goa: ‘या’ राज्यात २१ नोव्हेंबरपासून शाळा सुरू; SOP जारी – goa issues sops for partial re-opening of schools, allows 12 students per class


Partial re-opening of Schools: केंद्र सरकारने अनलॉक ५ अंतर्गत शाळा उघडण्यास परवानगी दिल्यानंतर अनेक राज्यांनी शाळा सुरू करण्याबाबत पावले उचलायला सुरूवात केली आहे. महाराष्ट्रात २३ नोव्हेंबर पासून नववी ते बारावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसाच शेजारील राज्य गोव्यात येत्या २१ नोव्हेंबरपासून दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत.

यासंदर्भातील स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर गोवा राज्य सरकारने जारी केले आहे. त्यानुसार, एका वर्गात १२ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना परवानगी नसेल. वर्गांसाठी सम-विषम फॉर्म्युला वापरण्यात येईल. विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांबाबत जागरुक करण्यात येईल. दोन विद्यार्थ्यांमध्ये किमान ६ फुटांचे अंतर राखले जाणे अनिवार्य आहे. कार्यशाळा किंवा प्रयोगशाळांमध्ये कोणतेही प्रशिक्षण घेण्यापूर्वी, उपकरणं हातळण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी त्यांचे हात सॅनिटाइज करणे अनिवार्य आहे.

शाळा व्यवस्थापनाने शिक्षक, शिक्षकेतरांना वैयक्तिक हायजिनसाठी लागणाऱ्या मास्क, सॅनिटायझर्स आदी वस्तू पुरवण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत. मागील महिन्यात, केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांवर, प्राप्त परिस्थितीनुसार शाळा सुरू करण्यासंबंधीचा निर्णय सोपवला होता. १५ ऑक्टोबर २०२० पासून राज्यांना शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यासंबंधी केंद्राने हिरवा कंदिल दाखवला होता.

दिवाळीनंतर शाळा भरणार; पालकांच्या लेखी संमतीनेच प्रवेश

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
%d bloggers like this: