Schools reopening: मुलांना शाळेत पाठवणे योग्य आहे का?; साशंक पालकांचे डॉक्टरांना फोन – schools reopening, should we send children to school, parents asking doctors


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

राज्यात नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्यात येणार आहेत. मात्र सद्यस्थितीत मुलांना शाळेत पाठवणे योग्य आहे का, असे प्रश्न पालकांनी डॉक्टरांना विचारायला सुरुवात केली आहे. दिवाळीनंतर शाळा सुरू झाल्या तर मुलांना शाळेत पाठवणे किती सुरक्षित आहे, अशी विचारणा करणारे अनेक फोन येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये असलेला संसर्ग हळूहळू नियंत्रणात येत असला तरी पुन्हा संसर्गाच्या दुसरी लाट येण्याची शंका सामान्यांच्या मनामध्ये उपस्थित होत आहे, तर मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण मोठ्यांच्या तुलनेमध्ये कमी असले तरीही ही मुले संसर्गाची वाहक होऊ शकतात, अशी चिंता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

शाळेत गेल्यानंतर मुलांनी सुरक्षित वावराच्या निकषांचे पालन करणे, स्वच्छता ठेवणे, सॅनिटायझरचा वापर करणे गरजेचे आहे. मात्र याचे पालन कितीजण करू शकतील, हा प्रश्नही पालकांनी उपस्थित केला आहे. पालकांच्या बोलण्यातून ताण व्यक्त होतो. कुटुंबामध्ये मुलांची काळजी सर्वाधिक घेतली जाते. त्यामुळे संसर्गाची शक्यता पूर्णपणे मावळलेली नाही.

‘अनेक विद्यार्थ्यांकडे खासगी गाड्यांचा पर्याय नसल्याने ते शाळेत जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुलांमध्ये संसर्ग होणार नाही, याची निश्चित खात्री देता येत नाही. मुलांमधील रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्याचा युक्तिवाद केला जातो. कोणतीही लक्षणे दिसत नसतील; मात्र ही मुले पॉझिटिव्ह असतील तर त्यांच्यामुळे घरातील ज्येष्ठांना संसर्ग होऊ शकतो, यावर गांभीर्याने विचार करायला हवा’, असे डॉ. आर. व्ही. मुकणे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांविना शाळा? पालकांकडून अपेक्षित प्रतिसाद नाही

दरम्यान, मुलांचे डबे खाण्याच्या, पाणी पिण्याच्या व्यवस्थेवर लक्ष ठेवण्याची अतिरिक्त जबाबदारी शाळांवर येणार आहे. त्यात वर्गातील पटसंख्याही विभागली जाणार आहे. त्यामुळे मुलांना शाळांमध्ये पाठवणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.

कॉलेजला जायचंय? पालकांचे संमतीपत्र आणा!

निर्णयाचा पुनर्विचार व्हावा

जनआरोग्य अभियानाचे समन्वयक डॉ. अभिजित मोरे यांनी शाळेमध्ये यासाठी भरपूक तयारी करावी, लागेल याकडे लक्ष वेधले. शाळेत मुलांच्या एकत्र येण्यावर कडक निर्बंध आणता येणार नाहीत. त्यामुळे संसर्ग पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करायला हवा. ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय अनेक जणांना सुसह्य नसला तरीही सरकारने शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी या निर्णयाचा पुनर्विचार करायला हवा, असाही मतप्रवाह पुढे येत आहे.

पाल्यांना करोना झाल्यास शाळा जबाबदार नाही: हमीपत्र

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
%d bloggers like this: