Schools reopening: पाल्यांना करोना झाल्यास शाळा जबाबदार नाही: हमीपत्र – school is not responsible if the child gets infected in school


म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यास राज्य सरकार ठाम आहे, तर शाळा व्यवस्थापन व पालकांनी त्या निर्णयाचा तीव्र विरोध केला आहे. त्यास्थितीतही शाळा सुरू करण्यास बाध्य केल्यास मुलांच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारण्यास शाळांनी नकार दिला आहे. पालकांनी त्यांच्या जबाबदारीवर मुलांना शाळेत पाठवावे, विद्यार्थ्याला करोना झाल्यास त्याला शाळा जबाबदार राहणार नाही, असे हमीपत्र पालकांकडून लिहून घेण्यात येत आहे.

पालकांकडून त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठवण्यास होकार अथवा नकार नोंदवण्यासाठी हमीपत्र लिहून घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाने शाळांना केल्या होत्या. त्यानुसार, शिक्षण विभागाने हमीपत्राचा नमुनादेखील शाळांना पाठवला आहे. त्यात विद्यार्थ्याचे नाव, इयत्ता, पालकांचे नाव पत्ता तसेच पालकांचा मोबाइल क्रमांक अशी माहिती विचारण्यात आली आहे. तसेच सरकारच्या निर्णयानुसार, मुलाला शाळेत पाठवण्यास तयार आहात अथवा नाही, असेही विचारले आहे. त्याशिवाय, पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यापूर्वी कोणत्या उपाययोजना कराव्यात, त्याच्या सूचना नमूद केल्या आहेत. परंतु, त्यात कोठेही मुलांना शाळेत करोना झाल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोणाची, त्याबाबत स्पष्ट उल्लेख केलेला नाही.

दरम्यान, राज्य सरकारच्या हमीपत्रातील ही उणीव शाळा व्यवस्थापनांनी भरून काढली आहे. शाळेकडून हमीपत्राचा दुसरा नमुना तयार करण्यात आला आहे. त्यात मुलांना शाळेत सोडण्याची आणि परत नेण्याची जबाबदारी पूर्णपणे पालकांची राहील, तसेच शासकीय नियमांचे पालन करण्याची आणि मुलाला शाळेत काही झाल्यास त्याची जबाबदारी पालकांची राहील, असे नमूद केले आहे. या हमीपत्रामुळे अनेक पालकांनी त्यांच्या मुलांना शाळेत पाठवण्यास नकार दिला आहे.

२३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याची जय्यत तयारी सुरू

विद्यार्थ्यांविना शाळा? पालकांकडून अपेक्षित प्रतिसाद नाही

हिवाळा तसाही संसर्गाचा…

हिवाळ्यात तसेही संसर्ग आजार होत असतात. अनेक मुले शाळेतूनच ताप, सर्दी व खोकला घरात आणतात. पण, करोना शाळेतून घरात आल्यास त्याच्या उपचाराचा खर्च शाळांनी देण्यास नकार दिला आहे, त्यामुळे यास्थितीत मुलांना शाळेत पाठवणे धोकादायक ठरेल, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

शाळा करताहेत विद्यार्थ्यांची माहिती ‘लीक’!!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
%d bloggers like this: