Schools in Mumbai: मुंबई महापालिकेची शाळांना ऑफलाइन परीक्षा घेण्याची संमती – bmc allows various education boards to conduct exams in mumbai


मुंबई महानगरपालिकेने विविध शिक्षण मंडळांना प्रत्यक्ष परीक्षा (ऑफलाइन परीक्षा) घेण्याची परवानगी दिली आहे. यात राज्य मंडळासह राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बोर्डांचा समावेश आहे. कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर योग्य त्या खबरदारीच्या उपायांसह नियोजित वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून परीक्षा घेण्याची परवानगी पालिकेने दिली आहे.

यापूर्वी कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेच्या भितीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने १५ जानेवारीपर्यंत शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भात मंगळवारी उशिरा मुंबई महापालिकेने आदेश जारी केले आहेत. परीक्षा झाल्या नाहीत तर विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. केम्ब्रिज बोर्ड इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आयोजित करू शकते तर अन्य बोर्ड म्हणजेच राज्य मंडळ, सीबीएसई, आयबी, आयसीएसई हे बोर्ड घोषित केलेल्या आणि घोषणा करणार असलेल्या अशा सर्व दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेऊ शकतात.

आरोग्यविषयक सर्व खबरदारीचे उपाय, स्वच्छता, सुरक्षेसंबंधी मार्गदर्शक तत्वे आदींचे शाळांनी काटेकोर पालन करावयाचे आहे. केंम्ब्रिज बोर्डाच्या नववी ते बारावीच्या फेब्रुवारी-मार्च सत्राच्या काही विषयांच्या परीक्षा २३ जानेवारीपासून सुरू होत आहेत.

गेल्या महिन्यात मुंबई महापालिकेने शहरातील यूएस आणि अन्य दूतावासांच्या यूएस-स्थित शाळा १८ जानेवारीपासून सुरू करण्याची परवानगी दिली होती. पण अन्य शैक्षणिक संस्था कधी सुरू होणार त्याबाबत अद्याप काही घोषणा केलेली नाही.

SSC HSC Exam: दहावी, बारावी परीक्षांच्या तारखांची घोषणा या आठवड्यातशाळा शुल्कासाठी अडवणूक सुरूच; दहावी-बारावी अर्ज भरताना पालकांसमोर अडचणी

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *