school reopening 2020: ७५ टक्के पालक मुलांना शाळेत पाठवण्यास इच्छुक नाहीत – school reopening 2020 nearly 75% of parents not willing to send kids to school now according to toi survey


हेमाली छापिया/विनम्रता बोरवणकर
School Reopening 2020: महाराष्ट्र सरकारने दिवाळीनंतर २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने गाइडलाइन्सदेखील जारी केल्या आहेत. विद्यार्थ्यांची उपस्थिती ऐच्छिक आणि पालकांच्या अनुमतीने असणार आहे. मात्र किती पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवतील, हे अजून गुलदस्त्यात आहे. दरम्यान, टाइम्स ऑफ इंडियाने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, ७५ टक्के पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास इच्छुक नाहीत.

टाइम्स ऑफ इंडियाने सुमारे ८ हजारांवर पालकांचे सर्वेक्षण केले. यापैकी तीन चतुर्थांश पालकांनी ऑनलाइन शिक्षणालाच पसंती दर्शवली आहे. सध्याच्या परिस्थितीत डिजीटल क्लासरुमच विद्यार्थ्यांसाठी सर्वात सुरक्षित आहेत, असं या पालकांना वाटतं.

या सर्वेक्षणानुसार, ७३.३ टक्के पालकांना असं वाटतं की सध्याच्या स्थितीत किमान काही काळ मुलांनी संगणकाद्वारेच शिक्षण घ्यावं. पालकांना यासाठी वेगवेगळी कारणं दिली. काही पालकांचं म्हणणं होतं की अजून करोनावर पूर्ण मात झालेली नसल्यानं मुलांना शाळेत पाठवणं खूप धोकादायक आहे. काही पालक करोनावरील लस येईपर्यंत शाळा नको, म्हणणारे होते. काही पालकांचे म्हणणे असं होतं की शाळेने विद्यार्थ्यांची पूर्ण जबाबदारी घेतली, तरच आम्ही त्यांना शाळेत पाठवू.

दिवाळीनंतर शाळा भरणार; पालकांच्या लेखी संमतीनेच प्रवेश

२२ टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्याची इच्छा प्रदर्शित केली. उर्वरित पालकांनी केवळ परीक्षेपुरतं किंवा प्रात्यक्षिक वर्गांपुरतं विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याची तयारी दर्शवली.

सर्वेक्षण कोणाचं?

६,६२३ खासगी शाळांच्या पालकांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला. यापैकी ४७२ शाळा आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या, १,१२३ सरकारी अनुदानित, १७१ केंद्र सरकारच्या अखत्यारितील आणि १६९ पालिका किंवा सरकारी शाळा होत्या. काही शाळांनी त्यांच्या पालकांचे स्वतंत्र सर्वेक्षण केले होते.

‘या’ राज्यात २१ नोव्हेंबरपासून शाळा सुरू; SOP जारी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
%d bloggers like this: