school reopening 2020: राज्यातील कोणत्या जिल्ह्यातल्या शाळा कधी उघडणार?…जाणून घ्या – school reopening 2020 in which districts shools are opening, know the details

School Reopening 2020: महाराष्ट्रातील शाळांमधील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सोमवार २३ नोव्हेंबर पासून प्रत्यक्ष सुरू होणार आहेत. मात्र याबाबत स्थानिक प्रशासनाने आपापल्या स्तरावर स्थानिक कोविड १९ स्थितीचा आढावा घेऊन निर्णय घ्यावयाचा आहे. कोणत्या जिल्ह्यातील प्रशासनाने शाळांबाबत कोणता निर्णय घेतला आहे, याबाबतची माहिती जाणून घेऊ…

– चंद्रपूर

सोमवारी २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा सुरू होणार.

– गडचिरोली

सोमवारी २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा सुरू होणार.

– गोंदिया

सोमवारी २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा सुरू होणार.

– यवतमाळ

सोमवारी २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा सुरू होणार.

– वाशिम

सोमवारी २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा सुरू होणार.

– हिंगोली

सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा प्रयत्न; पण निर्णयात बदलही होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

– परभणी

सोमवारपासून शाळा सुरू होण्याची शक्यता कमी आहे. उपाययोजना केल्यानंतर शाळा सुरू करण्यास परवानगी दिली जाईल.

शाळा सुरु होणार की नाही…शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती

– जालना

सोमवार २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार.

– औरंगाबाद

महानगरपालिका क्षेत्रातील शाळा बंद राहतील, उर्वरित भागातील शाळा सोमवारपासून उघडतील.

– धुळे

सोमवार २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार, पण पुन्हा कोविड-१९ परिस्थितीचा आढावा घेतला जाणार.

विद्यार्थ्यांविना शाळा? पालकांकडून अपेक्षित प्रतिसाद नाही

– नंदुरबार

सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा प्रयत्न; पण निर्णयात बदलही होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

-मुंबई, ठाणे, नवी मुंबई

सोमवारपासून शाळा सुरू होणार नाहीत.

मुंबईप्रमाणेच ठाणे, नवी मुंबईतही शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच

– रायगड

सोमवारपासून शाळा सुरू होणार.

– रत्नागिरी

सोमवारपासून शाळा सुरू होणार.

– सिंधुदुर्ग

सोमवारपासून शाळा सुरू होणार.

– सांगली

सोमवारपासून शाळा सुरू होणार.

– पुणे

महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळा १३ डिसेंबरपर्यंत उघडणार नाहीत. १३ डिसेंबर रोजी कोविड-१९ स्थितीचा आढावा घेण्यात येईल.

पुणे शहरातील शाळा बंदच राहणार; ग्रामीण भागात शाळा सुरू होणार

– नाशिक

शाळा सोमवारपासून सुरू करायच्या वा नाही याबाबतचा निर्णय रविवारी २२ नोव्हेंबर रोजी घेतला जाणार. जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यासंबंधी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
%d bloggers like this: