Sachin Tendulkar Corona: Farmer Team India Sachin Tendulkar Tests COVID-19 Positive


Sachin Tendulkar Corona: भारताचा विक्रमवीर आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने आपल्या ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली आहे. सचिनने स्वत:ला होम क्वारंटाईन केलं असल्याचीही माहिती दिली आहे. तसंच घरातील इतर सर्वांच्या कोविड चाचण्या या निगेटिव्ह आल्याचंही सचिननं ट्वीट करुन सांगितलं आहे. 

 

सचिननं सांगितलं की, आम्ही सर्वजण व्यवस्थित आहोत. कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचं पालन करत आहोत. सचिननं सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. 

नुकतचं सचिननं रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये सहभाग घेतला होता. यात सचिनच्या नेतृत्वात इंडिया लिजेंड्सनं शानदार कामगिरी करत विजय मिळवला. या मालिकेत सचिननं देखील चांगली कामगिरी केली होती. Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *