ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केले आहेत, ते त्यांचे अॅडमिट कार्ड अधिकृत प्रादेशिक संकेतस्थळावरून डाऊनलोड करू शकतात. बोर्डाद्वारे ३५ हजार पदांसाठी सिलेक्शन राउंड १ अंतर्गत संगणकीकृत परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा १६ जानेवारी २०२१ पासून आयोजित केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात २७ लाख उमेदवार एनटीपीसी परीक्षेत सामील होणार आहेत. पहिल्या टप्प्यात २३ लाख उमेदवार सामील झाले होते.
अॅडमिट कार्ड असे करा डाऊनलोड
येत्या शनिवार १६ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या एनटीपीसी फेज २ सीबीटी १ परीक्षेचे अॅडमिट कार्ड डाऊनलोक करण्यासाठी उमेदवारांना संबंधित रेल्वे भरती बोर्डाच्या वेबसाइटवर भेट द्यावी. अॅप्लिकेशन नंबर आदी माहिती भरून सबमीट करावे. मग नव्या पेजवर आपली माहिती भरून सबमीट करावी. यानंतर तुमचं अॅडमिट कार्ड स्क्रीनवर दिसेल. ते डाऊनलोड करून सेव्ह करून ठेवावे आणि एक प्रिंटही काढून ठेवावे.
परीक्षा केंद्रावर जाताना ऑनलाइन अॅडमिट कार्डच्या प्रिंटसह एक फोटो आयडी प्रूफही सोबत न्यावा.