pune university: करोनाच्या दुसऱ्या लाटेत पुणे विद्यापीठातील सहा कर्मचाऱ्यांचा मृत्यू – pune university death of six staff persons due to corona


हायलाइट्स:

  • पुणे विद्यापीठातील सहा कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू
  • काही कर्मचारी करोना बाधित आढळून आले
  • विद्यापीठ प्रशासनच्या चिंतेत भर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

करोनाच्या दुसऱ्या लाटेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सहा कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे अनेक कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाला असून ते विद्यापीठाच्या सहकार्याने उपचार घेत असल्याचे चित्र आहे. राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. करोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारकडून कडक निर्बंध घालण्यात आले आहे.

पुण्यात करोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. ही स्थिती असताना पुणे विद्यापीठातील काही कर्मचारी करोना बाधित आढळून आले आहेत. योग्य उपचाराने हे कर्मचारी बरे होत आहेत, ही समाधानकारक बाब आहे. मात्र, आतापर्यंत आठ कर्मचारी करोनाने दगावल्याचे दिसून आले. त्यामध्ये एक सहायक कक्षाधिकारी, दोन क्लार्क, एक शिपाई, १ प्रोग्रॅमर आणि एक सफाई कर्मचारी अशा सहा जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनच्या चिंतेत भर पडली आहे. दरम्यान, विद्यापीठातील कर्मचाऱ्या लेखा परिक्षणाच्या (ऑडिट) कामासाठी विद्यापीठ प्रशासनाने हजर राहण्याबाबत कळवले आहे. मात्र, शासन नियमापेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना बोलविले जात असल्याने कर्मचारी संघटनेकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. करोना काळात कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्यास विरोध होत आहे.

पुणे विद्यापीठातील अनेक कर्मचाऱ्यांनी करोनावर मात केली आहे. अजूनही काही कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असून ते उपचार घेत आहेत. करोनाची स्थिती पाहता विद्यापीठ प्रशासनाकडून प्रत्येक कर्मचाऱ्याला गरजेप्रमाणे मदत केली जात आहे. घर लहान असल्यामुळे कोरोनाचा संसर्ग झालेल्या एकूण ५ कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांची विद्यापीठाच्या गेस्ट हाउस मध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.

ज्या सुविधांचा विद्यार्थ्यांनी वापर केला नाही, तो खर्च फीमधून कमी करावा:SC
पुणे विद्यापीठ अभ्यासणार कोविड विषाणूचे नमुने

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *