pm modimay hold meeting with states cm to review coronavirus current-situation discussion on vaccine possible


नवी दिल्ली : देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशातच गुरुवारी 8 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीचं आयोजन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता ही बैठक सुरु होणार आहे.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार  अनेक राज्यांनी संचारबंदी लागू केली आहे. तसेच इतरही निर्बंध लागू केले आहेत. अशातच मोदी पुन्हा देशव्यापी  निर्णय घेणार का? याकडे सर्वांचं लक्षं लागलं आहे.

रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक  उच्चस्तरीय बैठक झाली होती. या बैठकीत कोरोना लसीच्या वितरणाबाबतही चर्चा झाली होती. या बैठकीत कॅबिनेट सचिव, पंतप्रधानाचे सचिव आणि डॉ. विनोद पॉल उपस्थित होते. 

 देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा विक्रम

देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले असून गेल्या 24 तासात देशात एक लाखांहून जास्त नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे तर 478 जणांचा मृत्यू झाला आहे. या आधी गेल्या वर्षी 16 सप्टेंबर 2020 ला देशातील सर्वात जास्त म्हणजे 97,894 रुग्णांची भर पडली होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या वाढून आता एक कोटी 25 लाख 89 हजार 67 इतकी झाली आहे. देशात सक्रीय रुग्णांची संख्याही वाढत असून ती आता सात लाख 41 हजार 830 इतकी झाली आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण 

राज्यात गेल्या 24 तासात तब्बल 57 हजार 074 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. राज्यात मागील 24 तासांत कोरोनामुळं  222 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 27508 रुग्णांनी कोरोनावर मातही केली आहे.

संबंधित बातम्या :

कोरोनाचा सामना करण्यासाठी 5 हजार वैद्यकीय अधिकारी 15 हजार नर्सेस उपलब्ध करुन देणार : अमित देशमुख

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *