PM Modi Meets State CMs: कोरोनाची दुसरी लाट वेळीच रोखायला हवी : पंतप्रधान नरेंद्र मोदी


नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. या कोरोनाच्या स्थितीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. देशातील कोरोनाची स्थिती आणि लसीकरणाची स्थिती या विषयावर त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला वेळेत रोखणे गरजेचं आहे. कोरोना संबंधीच्या नियमांचं पालन करणे गरजेचं आहे. गेल्या वर्षभरातील कोरोनाविरोधातील लढाईचं यश बेजबाबदारीत बदललं गेलं नाही पाहिजे. टेस्टिंग आणि ट्रेसिंग वेळेत होणे गरजेचं आहे. अनेक राज्यांमध्ये रॅपिड टेस्टवर जोर दिला जात आहे. मात्र आरटीपीसीआर टेस्ट 80 टक्क्यांच्यावर ठेवायला हव्यात, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.

अनेक राज्यांमध्ये लसी वापराविना पडून

यावेळी टियर-2 आणि टियर-3 शहरांत देखील कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. याआधी या शहरांमध्ये कोरोनाचा फैलाव जास्त झाला नव्हता. मात्र जर कोरोना ग्रामीण भागात पसरला तर त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण होऊन बसेल. छोट्या शहरांमध्ये कोरोना चाचण्या वाढवाव्या लागतील. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, केरळ आदी राज्यांनी अधिक काळजी घेणे गरजेचं आहे. अनेक राज्यांमध्ये लसी वापराविना पडून आहेत, याबाबत नरेंद्र मोदींनी चिंता व्यक्त केली. 

ठाण्यात कोविशील्ड ऐवजी कोवॅक्सिन लस देण्यावरुन गोंधळ, लसीकरणाला ब्रेक लागण्याची चिन्हे

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी निर्णायक पावलं उचलावी लागतील

कोरोनाच्या लढाईला एक वर्षाहून अधिकचा काळ झाला आहे. भारतीय नागरिकांनी कोरोनाचा जसा सामना केला, ते एक उदाहरण बनलं आहे, त्याची प्रशंसाही झाली. आज देशात 96 टक्के लोक कोरोनामुक्त झाले आहेत. काही राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. देशातील 70 जिल्ह्यांत ही वाढ 150 टक्क्यांपर्यंत आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेला वेळीच रोखलं पाहिजे. यासाठी आपल्याला निर्णायक पावलं उचलावी लागतील, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.  

महाराष्ट्राला दिलेल्या 54 लाख लसींपैकी केवळ 23 लाख लसींचाच वापर, प्रकाश जावडेकरांचा दावा

पाच राज्यांमध्ये 79.73 टक्के नवीन रुग्णांची नोंद

महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडू या पाच राज्यांमध्ये कोविडच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ सुरूच आहे. गेल्या 24 तासांत या राज्यांमधून 79.73 टक्के नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत 24,492 नवीन रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात  15,051 इतक्या सर्वाधिक संख्येने नवे रुग्ण आढळले आहेत.  त्यापाठोपाठ पंजाबमध्ये 1,818 तर केरळमध्ये  1,054  नवीन रुग्ण आढळले आहेत.

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *