Oxford university: ऑक्सफर्ड विद्यापीठाला शाकाहारी बनवण्यासाठी भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांचे अभियान – oxford student union votes to ban beef on campus to reduce carbon footprint


ऑक्सफर्ड विद्यापीठ विद्यार्थी संघटनेशी जोडलेल्या भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांसह अन्य काही विद्यार्थ्यांनी मिळून परिसर मांसाहारमुक्त बनवण्याचे अभियान सुरू केले आहे. आपल्या विद्यापीठातील कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उद्दिष्टासाठी हे अभियान सुरू केले असल्याचा या विद्यार्थ्यांचा दावा आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या वोरसेस्टर कॉलेजच्या विहान जैन या विद्यार्थ्यांने आपल्या अन्य दोन सहविद्यार्थ्यांसोबत मिळून हा प्रस्ताव तयार केला आहे आणि विद्यार्थी संघटनेने मागणी केली आहे की विद्यापीठाच्या जेवणातून बीफ आणि मांस काढून टाका.

या प्रस्तावावर मतदानही घेण्यात आले होते. ३१ जणांनी प्रस्तावाच्या बाजून तर ९ जणांनी विरोधात मतदान केले. १३ जण गैरहजर होते. प्रस्तावात म्हटले आहे की, ‘ब्रिटनचे प्रतिष्ठित विद्यापीठ या नात्याने संपूर्ण देश ऑक्सफर्ड नेतृत्वाकडे आशेने पाहत आहे, पण ऑक्सफर्डने जलवायू परिवर्तनात अद्यापही पुढाकार घेतलेला नाही.’

प्रस्तावात असं म्हटलंय की संस्था आपलं जेवण आणि परिसरातील अन्य रेस्टॉरंटमध्ये बीफ आणि मांसाहारी जेवण बंद करण्यामुळे कार्बन उत्सर्जनाचे आपले २०३० चे लक्ष्य गाठू शकेल. हा प्रस्ताव पारित झाल्याने आता विद्यार्थी संघटना विद्यापीठ आणि अन्य महाविद्यालयांमध्ये मांसाहारी जेवण कमी करण्यासाठी किंवा बंद करण्याच्या दिशेने अधिक सक्रीयतेने काम करू शकेल.

कोविड योद्ध्यांच्या मुलांना मेडिकलच्या ऑल इंडिया कोट्यात आरक्षण

GATE 2021: अॅप्लिकेशन करेक्शन विंडो पुन्हा उघडली

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
%d bloggers like this: