out of school children in mumbai: करोनामुळे मुंबईतील १० हजार मुले शाळाबाह्य – over 10 thousand children in mumbai out of school amid corona pandemic


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

करोनामुळे शिक्षण व्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. या वर्षभराच्या कालावधीत मुंबईतील तब्बल १० हजार ८२१ मुले शाळाबाह्य ठरली आहेत. यामध्ये मुलांची संख्या ५ हजार ६४६, तर मुलींची संख्या पाच हजार १७४ इतकी आहे. शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार मुंबई महापालिका आणि मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून करण्यात आलेल्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणातून ही आकडेवारी उघडकीस आली आहे.

करोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला, तर अनेकांची वेतनकपात झाली आहे. परिणामी अनेकांनी मुंबईबाहेर स्थलांतर केल्याने अनेक मुले शाळांपासून दूर झाली आहेत. अनेक मुले ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहू लागली. करोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्यावर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळाबाह्य मुलांना शोधण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार १ ते १५ मार्चदरम्यान राज्यामध्ये शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली. त्यानुसार मुंबई महापालिका आणि मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून राबवलेल्या शोधमोहिमेत १० हजार ८२१ मुले शाळाबाह्य आढळून आली. यामध्ये मुंबई महापालिकेने राबवलेल्या शोधमोहिमेत १० हजार १७७ मुले शाळाबाह्य सापडली. यामध्ये ५२७५ मुले, तर ४९०२ मुली आहेत. कधीच शाळेत न गेलेले १८२ विद्यार्थी सापडले, तर करोनामुळे अनियमित उपस्थितीमुळे तब्बल ९,९९५ विद्यार्थी शाळाबाह्य ठरले. त्याचप्रमाणे मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून राबवण्यात आलेल्या मोहिमेमध्ये ६४४ मुले शाळाबाह्य ठरली. यामध्ये मुले ३७१, तर मुली २७२ सापडल्या. कधीच शाळेत न गेलेले २३५ विद्यार्थी सापडले, तर करोनामुळे अनियमित उपस्थितीमुळे तब्बल ४०८ विद्यार्थी शाळाबाह्य ठरले असल्याचे शोधमोहिमेतून समोर आले आहे.

ठाणे जिल्ह्यातील ऑनलाइन शिक्षण: सव्वा लाखांहून अधिक ‘पाट्या फुटल्या’

बारा बालकामगार

अन्य कारणांमुळे शाळाबाह्य होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ६९३ इतकी आहे. यामध्ये १२ बालके बालकामगार असल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे विशेष गरज असलेल्या बालकांची संख्या १५९ इतकी आहे.

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; परीक्षेला अर्धा तास अधिक वेळ

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *