NTPC Jobs 2021: एनटीपीसीत विविध पदांवर भरतीNTPC Recruitment 2021: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये इंजिनीअरची सरकारी नोकरी मिळण्याची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. भारत सरकारच्या या कंपनीत ई ग्रेड मध्ये असिस्टंट इंजिनीअरच्या पदांवर भरतीसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहेत. कंपनीने दिलेल्या जाहीरातीनुसार, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्ट्रूमेंटेशन ट्रेड्स मध्ये सहाय्यक अभियंत्यांची एकूण २०० पदे आणि सहाय्यक केमिस्टची एकूण ३० पदे रिक्त आहेत. या पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे.

या पदांसाठी इच्छुक उमेदवार एनटीपीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच ntpccareers.net वर उपलब्ध करून देण्यात आलेल्या ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्मच्या माध्यमातून अर्ज करू शकतील. एनटीपीसी असिस्टंट इंजिनीअर भरती २०२१ ऑनलाइन अॅप्लिकेशन प्रक्रिया २४ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. उमेदवार १० मार्च २०२१ पासून ऑनलाइन अर्ज करू शकतील.

पात्रता

एनटीपीसी असिस्टंट इंजिनीअर भरती २०२१ साठी इच्छुक उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित ट्रेडमध्ये किमान ६० टक्के गुणांसह पदवी प्राप्त केलेली असणे अनिवार्य आहे. संबंधित ट्रेडमधील एक वर्षाचा अनुभव आवश्यक. सहाय्यक केमिस्ट पदांसाठी रसायन शास्त्रातील एमएससी पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक.

पदांची माहिती

असिस्टंट इंजिनीयर (इलेक्ट्रिकल) – ९० पदे
असिस्टंट इंजिनीयर (मेकॅनिकल) – ७० पदे
असिस्टंट इंजिनीयर (इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रूमेंटेशन) – ४० पदे
सहायक केमिस्ट – ३० पदे

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *