NEET UG Counselling 2020: दुसऱ्या फेरीला सुरुवात



MCC : मेडिकल काऊन्सेलिंग कमिटी (MCC) ने यूजी काऊन्सेलिंगच्या दुसऱ्या फेरीसाठी नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू केली आहे. ही दुसरी फेरी आधी १८ नोव्हेंबरपासून सुरू होणार होती. पण एमसीसीने ती दोन दिवस लांबणीवर टाकली होती.

ज्या उमेदवारांनी च्या दुसऱ्या फेरीत सामील व्हायचे आहे, त्यांना पुन्हा रजिस्टर करावे लागेल. ज्या उमेदवारांनी पहिल्या फेरीच्या काऊन्सेलिंगमध्ये सीट अलॉट केली होती, मात्र ते त्या राऊंडमध्ये सामिल झाले नव्हते, असे उमेदवार दुसऱ्या फेरीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

तिसरी फेरी कधी?

तिसऱ्या फेरीसाठी नोंदणी १० डिसेंबरपासून सुरू होणार आहे. तिसऱ्या फेरीचा निकाल १७ डिसेंबरला जाहीर होईल आणि त्यानुसार १८ ते २६ डिसेंबर या कालावधीत प्रवेश होतील.

NEET UG 2020: एमबीबीएस बीडीएस प्रवेशांची प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर

प्रवेश निश्चितीच्या वेळी लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे –

१) एनटीएने दिलेले परीक्षेचे अॅडमिट कार्ड
२) एनटीएने जारी केलेली निकालाची प्रत
३) जन्मतारखेचा दाखला
४) बारावीचे प्रमाणपत्र
५) बारावीची गुणपत्रिका
६) ८ पासपोर्ट आकाराची छायाचित्रे (जे छायाचित्र अर्जावर लावले असेल तेच हवे)
७) प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर
८) ओळखपत्र
या व्यतिरिक्त एनआरआय आणि विशेष प्रवर्गातील विद्यार्थांनी त्यांच्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे सादर करायची आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
%d bloggers like this: