NEET PG 2021 परीक्षा चार महिन्यांसाठी लांबणीवरवैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी नॅशनल एलिजीबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट म्हणजेच परीक्षा किमान चार महिन्यांसाठी लांबणीवर टाकण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाने याबाबतची घोषणा केली आहे.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून कोविड-१९ परिस्थितीशी सामना करण्यासाठी वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध व्हावे,’ अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

जे वैद्यकीय विद्यार्थी १०० दिवसांची कोविड ड्युटी पूर्ण करतील त्यांना आगामी शासकीय भरतीमध्ये प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही पंतप्रधान कार्यालयाने सांगितले. वैद्यकीय विद्यार्थ्यांना त्यांच्या फॅकल्टीच्या देखरेखीखाली कोविड मॅनेजमेंट ड्युटीसाठी तैनात केलं जाणार आहे.

MBBS च्या शेवटच्या वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांना सौम्य कोविड लक्षणे असणाऱ्या रुग्णांची देखरेख आणि टेलिकन्सल्टेशनसारखी कामे देण्यात येणार आहेत. बीएससी/जीएनएम पात्र नर्सेसना वरिष्ठ डॉक्टर आणि नर्सेसच्या देखरेखीखाली पूर्णवेळ कोविड नर्सिंग ड्युटी देण्यात येईल. यापूर्वी १५ एप्रिल २०२१ रोजी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी पीजी परीक्षा स्थगितीची घोषणा केली होती. देशातील वाढत्या करोना संसर्गाच्या स्थितीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *