National Education Day 2020: राष्ट्रीय शिक्षण दिन विशेष: जाणून घेऊ देशाच्या पहिल्या शिक्षणमंत्र्याविषयी – national education day 2020 know about indias first education minister maulana abul kalam azad


National Education Day 2020: भारतात दरवर्षी ११ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन (National Education Day) म्हणून साजरा केला जातो. देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद (Maulana Abul Kalam Azad) यांचा ११ नोव्हेंबर हा जयंती दिन आहे. ११ नोव्हेंबर २००८ पासून हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय तत्कालीन केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने घेतला होता.

मौलाना आझाद यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान बहुमोल आहे. यासाठी त्यांना १९९२ मध्ये सर्वोच्च भारतीय नागरी सन्मान असलेल्या ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

मौलाना आझाद यांच्याविषयी जाणून घेऊ –
– मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्म ११ नोव्हेंबर १८८८ रोजी झाला होता. त्यांचे वडील मोहम्मद खैरुद्दीन हे एक मुस्लिम विद्वान होते.
– मौलाना आझाद यांचे पूर्ण नाव – मौलाना सैयद अबुल कलाम गुलाम मुहियुद्दीन अहमद बिन खैरुद्दीन अल-हुसैन असे होते.
– स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना आझाद यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार केले. मोफत प्राथमिक शिक्षण हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते.
– मौलाना आझाद यांना आझाद या नावाने ओळखले जात होते. त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात देखील सहभाग घेतला होता. ते काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक होते.
– स्वातंत्र्योत्तर भारतात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आझाद उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातून खासदार म्हणून निवडून गेले आणि भारताचे पहिले शिक्षणमंत्री बनले.
– इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) आणि विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) च्या स्थापनेचं श्रेय मौलाना आझाद यांनाच दिलं जातं.
– त्यांनी शिक्षण आणि सांस्कृतिक विकासासाठी संगीत नाटक अकादमी (१९५३), साहित्य अकादमी (१९५४) आणि ललितकला अकादमी (१९५४) सारख्या संस्थांची देखील स्थापना केली.

अवघा ६ वर्षांचा भारतीय मुलगा कॉम्प्युटर प्रोग्रामर! गिनीज जागतिक विक्रमात नोंद

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
%d bloggers like this: