mumbai university exams online: मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षा ऑनलाइनच – mumbai university final exams will be conducted by online mode


हायलाइट्स:

  • मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षा ऑनलाइनच
  • परीक्षांचे आयोजन कॉलेज स्तरावर क्लस्टर पद्धतीने
  • सत्र १ ते ४च्या नियमित व बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांची परीक्षा १५ एप्रिल ते ५ मे या कालावधीत
  • सत्र ६च्या नियमिक व बॅकलॉगच्या परीक्षा ६ ते २१ मे या कालावधीत
  • सत्र ५च्या बॅकलॉगच्या परीक्षा २४ मे ते २ जून या कालावधीत

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई विद्यापीठाच्या मे महिन्यात होणाऱ्या विविध परीक्षा ऑनलाइनच होणार आहेत. यामध्ये पारंपरिक अभ्यासक्रमांना बहुपर्यायी प्रश्नांद्वारे, तर व्यावसायिक अभ्यासक्रमांना ५० टक्के बहुपर्यायी, तर ५० टक्के वर्णनात्मक प्रश्न अशाप्रकारे परीक्षांचे आयोजन कॉलेज स्तरावर करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने बुधवारी जाहीर केले. मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा नेमक्या कशा होणार याबाबत संदिग्धता होती. याबाबत परिपत्रक काढून विद्यापीठाने स्पष्टीकरण केले आहे.

विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार सत्र १ ते ४च्या नियमित व बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांची परीक्षा १५ एप्रिल ते ५ मे या कालावधीत घेण्यात येणार आहेत. तर सत्र ६च्या नियमिक व बॅकलॉगच्या परीक्षा ६ ते २१ मे या कालावधीत तर सत्र ५च्या बॅकलॉगच्या परीक्षा २४ मे ते २ जून या कालावधीत घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. परीक्षांचे नियोजन हे क्लस्टर कॉलेज या संकल्पनेनुसारच होणार आहे. यातील प्रमुख कॉलेजवर त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या कॉलेजांच्या परीक्षा सुरळीत पार पडतील याची जबाबदारी असेल. प्रश्नपत्रिकाही या क्लस्टर कॉलेजांच्या माध्यमातून तयार केल्या जातील. तोंडी परीक्षा ५ एप्रिलपासून विविध मीटिंग अॅप्सच्या माध्यमातून घ्याव्यात असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

अशी होणार परीक्षा

कला, वाणिज्य व विज्ञान या पारंपरिक अभ्यासक्रमांच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षेसाठी ५० गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे. यात ५० बहुपर्यायी प्रश्न असून त्यासाठी एक तासांचा कालावधी असणार आहे, तर व्यावसायिक अभ्यासक्रमांची परीक्षा ८० गुणांची होणार आहे. यात ४० गुण हे बहुपर्यायी प्रश्नांसाठी, तर ४० गुण वर्णनात्मक प्रश्नांची उत्तरे लिहण्यासाठी असणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना दोन तास वेळ देण्यात येणार आहे. आर्किटेक्चर शाखेच्या परीक्षेसाठी ४० गुणांची बहुपर्यायी, तर ८० गुणांची डिझाइन प्रश्नांवर आधारित परीक्षा होणार आहे. विधी शाखेची परीक्षा ६० गुणांची होणार असून ३० गुणांचे बहुपर्यायी आणि ३० गुणांचे वर्णनात्मक प्रश्न असणार आहेत.

हेही वाचा:
विद्यापीठाचे साक्षांकन ऑनलाइन; परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
दहावी-बारावीचे अंतिम वेळापत्रक, मार्गदर्शक सूचना वेबसाइटवर
घोकंपट्टी नव्हे व्यवहार्य ज्ञान; CBSE बोर्डाचा नवा मूल्यांकन आराखडा

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *