Mumbai University Exams 2020: मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षेच्या तारखा जाहीर – mumbai university exams 2020 first semester exam schedule announced by university


Mumbai University Exams 2020: मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील पहिल्या सत्राच्या (हिवाळी) परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. कला , वाणिज्य व विज्ञान शाखेच्या परीक्षा ३१ डिसेंबर पर्यंत होणार आहेत तर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा १५ जानेवारी पर्यंत होणार आहेत. पदवीच्या प्रथम वर्षाच्या प्रथम सत्राच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांच्या तारखा स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहेत.

कला, वाणिज्य, विज्ञान या पारंपरिक अभ्यासक्रमांच्या पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा ६० गुणांच्या ऑनलाइन पद्धतीने होतील. यात ५० बहुपर्यायी प्रश्न (MCQ) असतील. या परीक्षेसाठी १ तासाचा अवधी विद्यार्थ्यांना देण्यात येईल.

अभियांत्रिकी, एमसीए आणि फार्मसी या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा प्रत्येकी ८० गुणांच्या ऑनलाइन पद्धतीने होतील. या थिअरी परीक्षेत ४० गुणांचे प्रश्न बहुपर्यायी (MCQ) प्रकारचे असतील. या एमसीक्यू परीक्षेसाठी ४० मिनिटांचा अवधी असेल. उर्वरित ४० गुणांची परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) असेल. या डिस्क्रिप्टीव्ह परीक्षेसाठी ८० मिनिटांचा अवधी असेल. अशी एकूण २ तास कालावधीची परीक्षा होईल, अशी माहिती विद्यापीठाने जारी केलेल्या परिपत्रकात देण्यात आली आहे. परीक्षांचे मूल्यांकनही ऑनलाइन पद्धतीने महाविद्यालयातच होणार आहे.

विद्यार्थ्यांविना शाळा? पालकांकडून अपेक्षित प्रतिसाद नाही

आर्किटेक्चर शाखेची २० गुणांची परीक्षा एमसीक्यू तर ३० गुणांसाठी डिस्क्रिप्टिव्ह प्रकारची परीक्षा असेल. एमसीक्यूसाठी ३० मिनिटे आणि डिस्क्रिप्टिव्हसाठी एक तास असा परीक्षेचा एकूण कालावधी दीड तासाचा असेल.

विधी शाखेच्या अभ्यासक्रमाची परीक्षा ३० गुणांची ऑनलाइन बहुपर्यायी प्रकारच्या प्रश्नांची असेल तर थिअरी परीक्षा ३० गुणांची असेल. थिअरी परीक्षांसाठी १० प्रश्न विचारण्यात येतील.

कॉलेजला जायचंय? पालकांचे संमतीपत्र आणा!

परीक्षांच्या आयोजनासाठी विद्यापीठाने महाविद्यालयांना निर्देश दिले आहेत. परीक्षांचे आयोजन पदवी परीक्षांप्रमाणे कॉलेजांचे क्लस्टर करून त्यानुसार होणार आहे. ज्या विषयांच्या इंटरनल परीक्षा आहेत, त्यांचे गुण महाविद्यालयांनी २४ डिसेंबरपर्यंत विद्यापीठाला कळवायचे आहेत. १० डिसेंबरपासून या प्रॅक्टिकल, प्रोजेक्ट, तोंडी परीक्षा घ्यायच्या आहेत.

मुंबई विद्यापीठाचे परिपत्रक वाचा –

मुंबई विद्यापीठाचे परिपत्रक
विद्यापीठ पदवीपूर्व परीक्षांच्या आयोजनाची सविस्तर माहिती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
%d bloggers like this: