MPSC answer key: MPSC पूर्व परीक्षेची प्रोव्हिजनल आन्सर की जारी – mpsc preliminary exam 2020 provisional answer key released by commission


हायलाइट्स:

  • MPSC पूर्व परीक्षेची प्रोव्हिजनल उत्तरतालिका जारी
  • हरकत घेण्यासाठी ३१ मार्च २०२१ पर्यंतची मुदत
  • आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उत्तरतालिका

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२० ची उत्तरतालिका जाहीर केली आहे. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे त्यांना आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उत्तरतालिका पाहता येईल.

पेपर १ आणि २ ची उत्तरतालिका जारी करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना यातील कुठल्या प्रश्नोत्तरासंबंधी हरकत घ्यायची असेल तर आयोगाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या हरकतीच्या नमुन्यातर टपालाने आयोगाच्या पत्त्यावर हरकती पाठवायच्या आहेत. ३१ मार्च २०२१ पर्यंत आयोगाकडे आलेल्या हरकतींचीच दखल घेण्यात येईल, असं आयोगाने कळवलं आहे.

हरकती पाठवण्याचा पत्ता आहे – सहसचिव व परीक्षा नियंत्रक, महाराष्ट्र लोकसेवा आयोग ५, ७ व ८ वा मजला, कुपरेज टेलिफोन निगम, महर्षी कर्वे मार्ग, कुपरेज, मुंबई – २१

राज्य लोकसेवा आयोगा पेपर १ उत्तरतालिका पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

राज्य लोकसेवा आयोगा पेपर २ उत्तरतालिका पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

एमपीएससी पूर्व परीक्षा २०२० ही रविवारी २१ मार्च २०२१ रोजी आयोजित करण्यात आली होती. रीक्षेसाठी राज्यभरातून सुमारे दोन लाख ६० हजार विद्यार्थ्यांनी नोदणी केली होती. सकाळी १० ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ५ अशा दोन सत्रांत उमेदवारांनी परीक्षा दिली. पहिला पेपर १०० प्रश्‍नांचा आणि २०० गुणांचा होता.

JEE Main March Result 2021: जेईई मार्च सत्रात १३ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

गॅस सिलिंडर वाटून मुलीला केले ‘सीए’; नाशिकच्या जगवाणी कुटुंबाची यशोगाथा

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *