MPSC च्या परीक्षार्थींना प्रशासन कोविड किट देणार, सोलापूरच्या निवासी जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
पंढरपूर : अनेकवेळा लांबत गेलेली राज्य सेवा स्पर्धा पूर्व परीक्षा 21 मार्च रोजी होत आहे. मात्र कोविडचा धोका टाळण्यासाठी प्रत्येक परीक्षार्थींना कोविड किट देण्याची तयारी प्रशासनाने केली असल्याची माहिती सोलापूरचे निवासी जिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी दिली. या परीक्षा 21 मार्च रोजी सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रात होणार असून सोलापूर शहरातील 22 केंद्रावर 8800 परीक्षार्थी ही परीक्षा देणार आहेत.

सध्या सर्वत्र कोरोनाचा वाढत धोका लक्षात घेऊन प्रशासनाने प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी कोविड किट देण्याचे नियोजन केले असून यामध्ये हातमोजे, मास्क, सॅनिटायझर यांचा समावेश असणार आहे. परीक्षा देणाऱ्या कोणत्याच विद्यार्थ्याला कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आल्याचे निवासी जिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितलं. परीक्षार्थी परीक्षा केंद्रावर आल्यावर त्यांचे तपमान मोजून त्यांना प्रवेश दिला जाणार आहे. यानंतर त्यांना हे बेसिक कोविड किट दिले जाणार आहेत.

याचसोबत सर्व परीक्षा यंत्रणेत असलेल्या कर्मचाऱ्यांची कोविड तपासणी करुनच त्यांना परीक्षेसाठी नेमण्यात येणार असल्याचेही वाघमारे यांनी सांगितलं. या पर्यवेक्षकांनाही परीक्षार्थींच्या प्रमाणेच कोविड किट दिले जाणार असून विद्यार्थ्यांनी मोकळेपणाने परीक्षा द्यावी असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. या परीक्षेसाठी लागणारी सर्व कोविड किट जिल्हा प्रशासनाकडे आलेली असून आता परीक्षेच्यावेळी ते विद्यार्थ्यांना वितरित केले जातील.

परीक्षा पुढे ढकल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ, नवी तारीख जाहीर
राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर 14 मार्च रोजी एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर राज्यभरात विद्यार्थ्यांचा संताप पाहायला मिळाला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठवडाभरात परीक्षा घेण्याचं वचन दिलं. मग लोकसेवा आयोगाने परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली.

लोकसेवा आयोगाने काढलेल्या नवीन परिपत्रकानुसार 14 मार्च रोजीची रद्द केलेली परीक्षा 21 मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे. तर 21 मार्चनंतर होणाऱ्या परीक्षा या ठरलेल्या वेळेनुसारच होणार आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 27 मार्चला होणार आहे. तर 11 एप्रिलला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे.

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *