Minister Chhagan Bhujbal Tested Corona Positive


मुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून स्वतः छगन भुजबळ यांनी यासंदर्भात ट्वीट करुन माहिती दिली आहे. आरोग्यमंत्र्यांनी ट्वीटमध्ये त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचं आणि लक्षणं आढळल्यास तत्काळ चाचणी करुन घेण्याचं आवाहनही केलं आहे.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ट्वीट करत त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. छगन भुजबळ यांनी ट्वीट केलं आहे की, “माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी. माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.मास्क,सॅनिटायझरचा नियमित वापर करा.”

देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरोज आहिरे व नाशिक मधील दंतरोगतज्ञ डॉ.प्रवीण वाघ यांच्या विवाह सोहळ्यालास काल नाशिक येथे त्यांनी हजेरी लावली होती. या वेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार देखील उपस्थित होते. तसेच जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीला देखील ते उपस्थित होते. बैठकीला उपस्थित असणाऱ्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.

आठवड्याभरात  सहा मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मंत्री राजेंद्र शिंगणे, राज्यमंत्री बच्चू कडू, माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, भाजप खासदार रक्षा खडसे, नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांना कोरोनाची लागण झाली आहे.

संबंधित बातम्या :

PHOTO : दोन दिवसात राज्यातील चार मंत्र्यांसह ‘या’ महत्वाच्या व्यक्तींना कोरोनाची लागण

Rajesh Tope | आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण

 Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *