mini school on scooter: या शिक्षकाने तयार केली स्कुटीवरच मिनी शाळा! – madhya pradesh goernment school teacher has set up a mini-library on his scooter


करोना काळात जशी आरोग्याच्या क्षेत्रात कोविड योद्ध्यांनी मोलाची कामगिरी बजावली, तशीच अनेक शिक्षकांनीही कोविड योद्ध्यांप्रमाणे काम केले. कोविड-१९ महामारीमुळे शाळा गेले वर्षभर बंदच आहेत. विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. ग्रामीण भागातल्या अनेक विद्यार्थ्यांना स्मार्टफोट, इंटरनेट कनेक्टिव्हिटी अभावी शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. मध्य प्रदेशातील एका गावात मात्र एक शिक्षक अशा मुलांसाठी देवदूत बनून आले आहेत.

मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात एका सरकारी शाळेतील एका शिक्षकाने विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी एक अनोखी कल्पना लढवली आहे. या शिक्षकांनी आपल्या स्कूटर वरच मिनी शाळा आणि ग्रंथालय तयर केले आहे. ही स्कूटर ते गावोगाव घेऊन जातात आणि मुलांना शिकवतात. सागर चंद्र श्रीवास्तव असं या शिक्षकांचं नाव आहे. एखाद्या झाडाखाली मग त्यांचा वर्ग भरतो.

सागर चंद्र श्रीवास्तव सांगतात, ‘येथे विशेषत: विद्यार्थी गरीब परिवारातले आहेत आणि ते स्मार्टफोट घेऊ शकत नाहीत. त्यामुळे ते ऑनलाइन शिक्षणामुळे वंचित राहात आहेत. आम्हाला अनेक ठिकाणी नेटवर्क कनेक्टिव्हिटी देखील मिळत नाही. मग मी व्हिडिओ डाऊनलोड करून ठेवतो आणि विद्यार्थ्यांना मोबाइलवर दाखवतो आणि नंतर मी त्यांना स्कूटीवर शिकवायला सुरू करतो. या स्कुटीच्या एका बाजुला फळा आहे तर दुसऱ्या बाजुला पुस्तके असतात.’

सागर चंद्र श्रीवास्तव विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी पुस्तके देखील देतात, विद्यार्थी दोन-तीन दिवस ही पुस्तके स्वत:कडे ठेवू शकतात. श्रीवास्तव यांनी हे देखील सांगितले की, ‘अनेक ठिकाणी मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसते. ही बाब लक्षात घेऊन मी ५ स्मार्टफोन खरेदी केले आहेत. ते मी विद्यार्थ्यांना वापरायला देतो. ग्रंथालयातली पुस्तके देखील २-३ दिवस ठेवण्यासाठी देतो.’

श्रीवास्तव यांच्या या उपक्रमाचं या भागात कौतुक होत आहे.

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *