MHT CET 2020: B.Tech, B. Pharma अभ्यासक्रमांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जाहीर – mht cet 2020 provisional merit list for b.tech, b. pharma, mba mms courses released on mahacet org


महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell) ने MHT CET 2020 ची B.Tech, B. Pharma/ Pharma D अभ्यासक्रमांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट शनिवारी जाहीर केली. महाराष्ट्र आणि ऑल इंडिया उमेदवारांसाठी ही मेरिट लिस्ट सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

mahacet.org या सीईटी सेलच्या वेबसाइटवर ही यादी उमेदवार पाहू शकतील. स्टेप बाय स्टेप कशी पाहायची ही मेरिट लिस्ट पाहा –

– सीईटी कक्षाच्या अधिकृत वेबसाइटवर mahacet.org वर जा.

– होम पेजवर B.E/B.Tech लिंकवर जा.

– प्रोविजनल मेरिट लिस्ट आता स्क्रीनवर दिसू लागेल.

– विद्यार्थी आता MHT CET पर्सेंटाइलनुसार तयार केलेल्या या यादीत स्वत:चे नाव पाहू शकतील.

‘या’ जिल्ह्यात शाळा उघडण्याचा मार्ग मोकळा

बीई / बीटेकची अंतिम गुणवत्ता यादी ६ जानेवरा २०२१ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. MBA अभ्यासक्रमांची अंतिम गुणवत्ता यादी ७ जानेवारी २०२१ रोजी जाहीर केली जाणार आहे. अॅग्रीकल्चर अभ्यासक्रमांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ४ जानेवारी रोजी जाहीर होईल.

विद्यार्थ्यांची यंदा ‘फार्मसी’ला पसंती; जागांच्या संख्येतही वाढ

महाराष्ट्र सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर जाण्यसाठी येथे क्लिक करा.

MHT CET 2020 Provisional Merit List of B.Pharma/ Pharma D पाहण्याच्या थेट लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

MHT CET 2020 Provisional Merit List for B.E/ B.Tech Courses पाहण्याच्या थेट लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *