maharashtra set exam: सेट परीक्षेची तारीख जाहीर; कधी होणार परीक्षा जाणून घ्या… – maharashtra set exam will be on 27th december


राज्य पात्रता परीक्षा अर्थात सेट परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. सेट परीक्षेचे रजिस्ट्रार आणि मेंबर सेक्रेटरी यांनी अधिकृत संकेतस्थळावर परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. वेळापत्रकानुसार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येणारी सेट परीक्षा २७ डिसेंबर रोजी होणार आहे.

महाराष्ट्र सेट परीक्षा महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांसाठी होते. यापूर्वीच्या नियोजित वेळापत्रकानुसार ही परीक्षा २८ जून रोजी होणार होती. मात्र कोविड १९ महामारी आणि त्यामुळे जाहीर झालेला लॉकडाऊन यामुळे ही परीक्षा लांबणीवर पडली होती.

ज्या उमेदवारांनी सेट परीक्षेसाठी नोंदणी केली आहे, ते अधिकृत संकेतस्थळावर जाऊन परीक्षेसंदर्भातील माहिती, वेळापत्रक डाऊनलोड करू शकतात. संकेतस्थळाची लिंक या वृत्ताच्या अखेरीस देण्यात येत आहे. यासोबतच परीक्षेच्या तारखेची माहिती देणाऱ्या परिपत्रकाची लिंकही या वृत्तात देण्यात येत आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांसाठी घेण्यात येणारी सेट परीक्षा २८ जून २०२० रोजी होणार होती. मात्र आता ही परीक्षा २७ डिसेंबर २०२० रोजी होणार आहे. परीक्षेसंदर्भातील सर्व ताज्या माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.’

भारतीय वन सेवा (IFS) च्या मुख्य परीक्षेसाठी DAF-1 अर्ज जारी

परीक्षेच्या तारखेसंदर्भातील परिपत्रक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सेट परीक्षेसंदर्भातील अद्ययावत माहितीसाठी संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
%d bloggers like this: