Maharashtra Corona Update Today 48621 New Patients Diagnosed In The State | Corona Update


मुंबई : राज्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णसंख्येच काहीशी घट झाली आहे. राज्यात आज 48 हजार  621 कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले. तर 59, 500 कोरोना रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. सध्या राज्यात 6 लाख 56 हजार 870 रुग्णांना उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 70 हजार 851 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

राज्यात आजपर्यंत एकूण 40,41,158 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचेप्रमाण (Recovery Rate) 84.7% एवढा झाला आहे. दरम्यान आज 567 कोरोना बाधित रुग्णांनी आपला जीव गमावला. सध्या राज्यातील मत्यूदर 1.49% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,78,64,426 प्रयोगशाळा नमुन्याांपैकी 47,71,022 (17.12 टक्के)नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 39,08,491 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 28,593 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

गेल्या 24 तासात देशात 3 लाख 68 हजार कोरोनाबाधितांची नोंद

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात 3 लाख 68 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 3 हजार 417 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच तीन लाख 732 रुग्ण उचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. 

देशातील आजची कोरोना स्थिती :  

एकूण कोरोनाबाधित रुग्ण : एक कोटी 99 लाख 25 हजार 604
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : एक कोटी 62 लाख 93 हजार 003
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण : 34 लाख 13 हजार 642
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 2 लाख 18 हजार 959
देशात आतापर्यंत लसीकरणाची आकडेवारी : 15 कोटी 71 लाख 98 हजार 207 डोस

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *