Lockdown Update | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कुठे-कुठे काय-काय निर्बंध?
मुंबई : राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तर काही ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. शहरी भागात परसलेला कोरोना आता तळगळापर्यंत पोहोचला आहे. कोरोना रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधीही कमी कमी झाला आहे, त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करण्यावर राज्य शासनानं भर दिला आहे. या निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात रविवारी (दिनांक 28 मार्च 2021)  रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

बीड, नांदेडमध्ये लॉकडाऊनची घोषणा

बीडध्ये पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. 25 मार्च  ते 4 एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. विशेष म्हणजे या दरम्यान जिल्ह्यातील पूर्ण वाहतूक व्यवस्था बंद असेल अत्यावश्यक सेवा जरी चालू असल्या तरी किराणा दुकाने मात्र सकाळी 7 ते 9 या दोन तासाच्या वेळेमध्ये सुरू असतील तेही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन सुरु ठेवावीत असे आदेश बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले आहेत.

नांदेड जिल्ह्यातही 25 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे.  या दरम्यान शाळा, महाविद्यालये,कोचिंग क्लासेस, लग्नसमारंभ, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम, मेळावे, आठवडी बाजार,सार्वजनिक कार्यक्रम, हॉटेल्स, बार, सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहने, चित्रपटगृह, मॉल्स, जलतरण तलाव ,राजकीय सभा, मटण चिकनची दुकाने, पार्लर, सलून,सार्वजनिक  ठिकाणी फिरणे हे सर्वतः बंद राहणार आहे.

कल्याण-डोंबिवली

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने हळूहळू निर्बंधही वाढवण्यास सुरुवात केली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात दर शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने आणि कार्यालये बंद ठेवण्याचे निर्देश महापालिकेने दिले असून आजपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे.

नागपूर

नागपुरातकी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार भाजी दुकान, अत्यावश्यक वस्तू सेवा आता 4 वाजेपर्यंत सुरु आहेत. हॉटेल, रेस्टॉरंटमधून डायनिंग संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुरू आहे. हॉटेल, रेस्टॉरंटमधून ऑनलाईन पार्सल सेवा रात्री 11 वाजेपर्यंत सुरु आहे.  शाळा महाविद्यालय बंद राहतील. ऑनलाईन शिक्षण आणि परीक्षा होईल. सर्व सार्वजनिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम बंद आहेत. लग्न घरगुती पातळीवर 50 पेक्षा कमी उपस्थितांमध्ये करण्याची मुभा आहे.

सोलापूर

सोलापुरात आजपासून विकेंड लॉकडाउनला सुरुवात झाली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने शनिवार-रविवार बंद राहतील. इतर दिवशी सकाळी सात ते संध्याकाळी सातपर्यंत दुकाने सुरू राहतील. नागरिकांना दिवसभर फिरण्याची मुभा, रात्री 11 ते 5 पर्यंत मात्र रात्र संचारबंदी लागू असणार आहे.

परभणी

परभणी जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा कडक संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. 24 मार्चपासून ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 24 मार्च सायंकाळी 7 वाजेपासून ते 1 एप्रिलच्या पहाटे 6 वाजेपर्यंत अशी जिल्ह्यात 7 दिवसांची संचारबंदी असणार आहे. या संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवांना मुभा असणार आहे. शिवाय किराणा माल घरपोच विक्री करणे, दूध विक्रीसाठी सकाळी 6 ते 9  या वेळ मर्यादा आखून देण्यात आली आहे. अँटीजेन, आरटीपीसीआर तपासणी, लस घेण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना देखील यातून सुट देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

पालघर

येत्या पाच एप्रिलपासून जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, खाजगी क्लासेस तसेच सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम पुर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुकाने, मॉल्स, हातगाडी व ठेल्यांवरील खाद्य पदार्थ विक्रेत्यांसह अनेक बाबींवर वेळेचे व नागरिक क्षमतेचे बंधन लादण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व दुकाने 5 एप्रिल 15 एप्रिलनंतर मात्र लॉन्स, मंगल कार्यालये, हॉल्स व तत्सम ठिकाणी लग्न व इतर समारंभ आयोजित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. अत्यंविधी कार्यक्रमामध्ये देखील 20 पेक्षा जास्त व्यक्तींना उपस्थित राहता येणार नाही.पासून सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंतच सुरु राहतील. मात्र हे निर्बंध अत्यावश्यक सेवा, मनुष्य व प्राणीमात्रांसाठी जिवनावश्यक वस्तू, दूध, पेट्रोल पंप व औषधांच्या दुकानांना लागू राहणार नाही.

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *