jee may exam postponed: JEE Main: जेईई मेन २०२१ मे सत्राची परीक्षाही लांबणीवर – jee main may 2021 postponed by nta


JEE Main postponed: जेईई मेन २०२१ मे सत्राची परीक्षा देखील स्थगित करण्यात आली आहे. करोना विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक ट्विट करत यासंबंधीची माहिती दिली आहे.

एप्रिल नंतर आता जेईई मेन मे सत्राची परीक्षा देखील लांबणीवर पडली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने यासंबंधी नोटीस जारी केली आहे. जेईई मेन मे २०२१ सत्रासाठी नोंदणी सुरू करण्यात आली नव्हती. एनटीएने सांगितले की नोंदणीची तारीख नंतर घोषित केली जाईल. सोबत विद्यार्थ्यांना असा सल्लाही दिला आहे की हा अतिरिक्त वेळ विद्यार्थ्यांनी चांगली तयारी करण्यासाठी उपयोगात आणावा.
NTA Abhyas App च्या माध्यमातून घरबसल्या मॉक टेस्टचा सराव करा.

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *