jee main neet 2020: विदर्भातील पूरसदृश स्थितीमुळे जेईई, नीटला मुकणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही – jee main neet 2020 students in vidarbha who might miss the exam will not suffer assure education minister


JEE Main NEET Update: जेईई मेन परीक्षा १ ते ६ सप्टेंबर २०२० या कालावधीमध्ये आणि १३ सप्टेंबर २०२० रोजी नीट परीक्षा होणार आहे. विदर्भातील पूरसदृश स्थितीमुळे या भागातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. या भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा देणे शक्य नाही. ही पार्श्वभूमी लक्षात घेता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तत्काळ केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याशी संवाद साधला.

सामंत यांनी विद्यार्थ्यांचे कसलेही शैक्षणिक नुकसान होऊ देऊ नये,अशी विनंती केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांना केली आहे. ही विनंती त्यांनी तत्काळ मान्य करीत या भागातील एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे आश्वासन दिले.

श्री. सामंत म्हणाले,या भागात नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती आणि अकोला हे परीक्षा केंद्र आहेत. परीक्षा ही सकाळी ९ ते १२ व दुपारी ३ ते ६ या वेळेत होणार आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली येथील जवळपास १५ हजारांहून अधिक विद्यार्थी ‘जेईई-मेन्स’मध्ये सहभागी होणार आहेत. पावसामुळे काही गावांचा संपर्क तुटला असून पूलदेखील पाण्याखाली गेले आहेत. अशा स्थितीत गावांपासून परीक्षेच्या केंद्रावर पोहोचने अडचणीचे आहे.

JEE Main परीक्षार्थींना रेल्वे प्रवासाची मुभा

याबाबतची सविस्तर माहिती केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांना सामंत यांनी दिली आहे. तसेच विद्यार्थी आणि पालकांनी काळजी करू नये, विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार असेही सामंत यांनी सांगितले.

जेईई मेन परीक्षा २०२०; ‘या’ गोष्टी ध्यानात असू द्या…

मुंबई व उपनगरातील विद्यार्थ्यांना ट्रेन प्रवासाची मुभा

जेईई मेन या प्रवेश परीक्षेसाठी मुंबई तसेच उपनगरातील विद्यार्थ्यांसमोर प्रवास कसा करायचा हा मोठा प्रश्न होता. यावर आता मध्य व पश्चिम रेल्वेने तोडगा काढला असून या विद्यार्थ्यांना उनगरीय रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे परीक्षेचे प्रवेशपत्र पाहून विद्यार्थ्यांना रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाईल असे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार तसेच पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी संयुक्त प्रसिद्ध पत्रकात स्पष्ट केले आहे.

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *