JEE Main March Result 2021: जेईई मार्च सत्रात १३ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइलNTA JEE Main result March 2021: जेईई मेन मार्च 2021 परीक्षेचा (JEE Main March 2021) निकाल जाहीर झाला आहे. नॅशनल टेस्टिंग एजेंसी (NTA) ने आपली अधिकृत वेबसाइट nta.ac.in आणि जेईई मेनची वेबसाइट jeemain.nta.nic.in वर निकाल जारी केला आहे

निकालाची थेट लिंक या वृत्तात पुढे देण्यात आली आहे. तेथे उमेदवारांनी आपला अॅप्लीकेशन नंबर / रोल नंबर, जन्मतारीख किंवा पासवर्ड आणि कॅप्चा आदि माहिती भरून सबमीट करावी. तुमचा स्कोर स्क्रीन वर दिसेल.

एनटीएने १६ ते १८ मार्च २०२१ या कालावधीत ही परीक्षा आयोजित केली होती. सध्या पेपर-1 परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात एकूण ६,१९,६३८ उमेदवार सहभागी झाले होते.

१३ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल
एकूण १३ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल गुण मिळाले आहेत. ही संख्या फेब्रुवारी सत्राच्या निकालापेक्षा दुप्पट आहे. यावेळी १०० पर्सेँटाइल स्कोर करणाऱ्या १३ विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकी तीन विद्यार्थी राजस्थान आणि तेलंगणमधील आहेत. दिल्लीच्या दोन, महाराष्ट्राच्या दोन, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि बिहारच्या प्रत्येकी एका विद्यार्थ्याने १०० पर्सेंटाइल मिळवले आहेत.

जेईई मेन फेब्रुवारी 2021 परीक्षेत सुमारे ६.५२ लाख विद्यार्थ्यांनी पेपर-1 (BE/BTech) परीक्षा दिली होती. यातील ६ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाइल पटकावले होते. यातील दोन विद्यार्थी दिल्लीचे तर एकेक विद्यार्थी राजस्थान, महाराष्ट्र, चंदीगड, गुजरातमधला होता.

JEE Main March 2021 Toppers: टॉपर्सची यादी
बन्नूरू रोहित कुमार रेड्डी – तेलंगण
ब्रतिन मंडल – पश्चिम बंगाल
सिद्धार्थ कालरा – दिल्ली
कुमार सत्यदर्शी – बिहार
मृदुल अग्रवाल – राजस्थान
अश्विन अब्राहम – तमिलनाडु
अथर्व अभिजीत तांबट – महाराष्ट्र
बक्षी गार्गी मकरंद – महाराष्ट्र
मदुर आदर्श रेड्डी – तेलंगण
जेनिथ मल्होत्रा – राजस्थान
जॉस्यूला वेंकट आदित्य – तेलंगण
रोहित कुमार – राजस्थान
काव्य चोप्रा – दिल्ली

हेही वाचा:

जेईई मेन निकालाचं प्रसिद्धीपत्रक पुढीलप्रमाणे –

हेही वाचा:

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *