jee main 2021: जेईई मेन २०२१: ड्युप्लिकेट फी मे सत्र परीक्षेनंतर उमेदवारांना परत केली जाणार – jee main 2021 refund of duplicate fee after the may session


संयुक्त प्रवेश परीक्षा म्हणजेच जेईई मेन 2021 (JEE Main 2021) साठी ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यांच्यासाठी एक महत्त्वाचे अपडेट आहे. या परीक्षेच्या नोंदणीवेळी एकापेक्षा अधिक वेळा जर तुमचे शुल्क भरले गेले असेल तर अशी ड्युप्लिकेट फी मे सत्र परीक्षेनंतर उमेदवारांना परत केली जाईल. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने २६ मार्च २०२१ रोजी अधिकृत संकेतस्थळावर यासंबंधीचे परिपत्रक जाहीर केले आहे.

यंदा जेईई चार वेळा आयोजित करण्यात येणार आहे. त्यापैकी फेब्रुवारी आणि मार्च सत्राची परीक्षा झाली आहे तर एप्रिल आणि मे सत्राची परीक्षा अद्याप व्हायची आहे. जेईई मेन २०२१ परीक्षा योजनेनुसार उमेदवार एक किंवा सर्व सत्रांसाठी एकत्र किंवा स्वतंत्रपणे अर्ज करू शकतो. फेब्रुवारी सत्रासाठी अर्ज करण्याची मुदत १६ डिसेंबर २०२० ते २३ जानेवारी २०२१ पर्यंत होती आणि या सत्रासाठी फी भरण्याची मुदत २४ जानेवारी २०२१ पर्यंत होती. फेब्रुवारी सत्राच्या अर्ज दुरुस्तीचा कालावधी २७ ते ३० जानेवारी २०२१ पर्यंत होता.

ड्युप्लिकेट फीसंबंधी परिपत्रक डाउनलोड करण्याची थेट लिंक येथे आहे

त्याचप्रमाणे मार्च सत्रासाठी अर्ज करण्याची मुदत २ ते ६ मार्च २०२१ पर्यंत होती आणि फी भरण्याची मुदत ६ मार्च २०२१ पर्यंत होती. फेब्रुवारी सत्राच्या विद्यमान उमेदवारांसाठी आणि मार्च सत्रातील नवीन उमेदवारांसाठी दुरुस्तीच्या भरणासह दुरुस्ती कालावधी शुल्क, २ ते ६ मार्च २०२१ पर्यंत भरण्यात आले.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने कळविले आहे की संबंधित उमेदवारांना डुप्लिकेट फीचा परतावा (जर असेल तर) मे सत्र परीक्षेनंतरच दिला जाईल. २०२१ मे च्या सत्राचा अर्ज आणि दुरुस्ती करण्याचा कालावधी संपल्यानंतरच फी परताव्या संदर्भातील काम सुरू केले जाईल. जेईई मेन – एनटीएची अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in आहे .

डुप्लिकेट फीच्या परताव्यासंदर्भात कोणतीही शंका असल्यास उमेदवारांनी एनटीएकडे jeemain@nta.ac.in वर संपर्क साधावा किंवा ०११-४०७५९००० वर संपर्क साधावा, असे आवाहन एनटीएने केले आहे. तूर्त जेईई मेन २०२१ परीक्षेच्या डुप्लिकेट फीच्या परताव्याचा दावा करण्यासाठी अर्जदारांनी मे २०२१ च्या सत्रापर्यंत थांबावे, असे सूचित करण्यात आले आहे.

ICAI CA Result 2021: सीए इंटरमिडिएट परीक्षेचा निकाल जाहीर

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट (CLAT) साठी अर्ज करण्यास मुदतवाढ

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *