JEE Main एप्रिल सत्राच्या अर्जदुरुस्तीसाठी मुदतवाढApril Session: नॅशनल टेस्टिंग एजन्सीनी (NTA) ने जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन, म्हणजे एप्रिल सत्रासाठी अर्जात दुरुस्ती करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. सोबतच शुल्क जमा करण्याची अंतिम मुदतही वाढवण्यात आली आहे. यासंबंधी अधिकृत वेबसाइटवर एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यानुसार, आता उमेदवार परीक्षा 2021 च्या एप्रिल सत्रासाठी ६ आणि ७ एप्रिल २०२१ रोजी रात्री ११.५० वाजेपर्यंत अर्जात दुरुस्ती करू शकतील तसेच शुल्क जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकतील.

अर्जात दुरुस्ती करण्यासाठी, उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत वेबसाइट, jeemain.nta.nic.in वर जावे. यानंतर होमपेज वर जेईई मेन 2021: रजिस्ट्रेशन फॉर्म करेक्शन लिंक वर क्लिक करा. आता एक नवे पेज उघडेल. तेथे उमेदवारांनी आपला अॅप्लिकेशन नंबर, पासवर्ड आणि सिक्युरिटी पिन आदी माहिती भरावी. आता तुमचा अर्ज स्क्रीन वर उघडेल. तेथे दुरुस्ती करायची असल्यास दुरुस्ती करा आणि सबमीट करा.

जेईई मेनच्या तिसऱ्या सत्राची म्हणजेच एप्रिलची जेईई मेन परीक्षा २७, २८, २९ आणि ३० एप्रिल रोजी होणार आहे. एप्रिल सत्राची जेईई मेन परीक्षा पेपर-1 (बीई/बीटेक) साठी आयोजित केली जाईल. परीक्षेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांचे अॅडमिट कार्ड काही दिवसात जारी केले जातील. मात्र कोणत्या दिवशी अॅडमिट कार्ड मिळतील त्याची निश्चित तारीख अद्याप एनटीएकडून जारी करण्यात आलेली नाही. नव्या अपडेट साठी उमेदवारांनी वेबसाइट पाहात राहावी. एप्रिल सत्राच्या जेईई मेन परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया २५ मार्च, २०२१ पासून सुरू झाली होती. अर्जाची अंतिम मुदत ४ एप्रिल २०२१ होती. शुल्क जमा करण्याची मुदत ५ एप्रिल पर्यंत होती. या तारखा आता वाढवण्यात आल्या आहेत.

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *