Indian students in US: भारतीय विद्यार्थ्यांचे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत ७.६ अब्ज डॉलर्सचे योगदान! – indian students contributed usd 7.6 billion to us economy last year


भारतीय विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० मध्ये अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत तब्बल ७.५ अब्ज डॉलर्सचे योगदान दिले आहे. मात्र दुसरीकडे भारतीय विद्यार्थ्यांच्या एकूण संख्येत ४.४ टक्के घसरण झाली आहे.

ओपन्स डोअर्स २०२० (Opens Doors 2020) च्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की अमेरिकेत येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक विद्यार्थी चीनमधून येतात आणि गेली १६ वर्षे सातत्याने ही संख्या वाढते आहे. २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षात अमेरिकेत ३,७२,००० हून अधिक चीनी विद्यार्थी होते.

चीननंतर भारताचा क्रमांक लागतो. मात्र या शैक्षणिक वर्षात ही संख्या ४.४ टक्के कमी होऊन १,९३,१२४ झाली आहे. अमेरिकेच्या ‘स्टेटस ब्युरो ऑफ एज्युकेशनल अँड कल्चरल अफेअर्स’ मंत्रालय आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थेद्वारे एक अहवाल जारी करण्यात आला होता. त्यानुसार, अमेरिकेत सलग पाच वर्षे एका शैक्षणिक वर्षात दहा लाखांहून अधिक आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आले.

मात्र, २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षात अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या संख्येत अल्पशी घसरण (१.८ टक्के) झाली आहे. आताही अमेरिकेतील उच्च शिक्षण संस्थेत एकूण विद्यार्थ्यांच्या ५.५ टक्के प्रमाण या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे आहे. अमेरिकेच्या अर्थमंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी २०१९ मध्ये अमेरिकी अर्थव्यवस्थेत ४४ अब्ज डॉलर्सचे योगदान दिले आहे, यापैकी भारतीय विद्यार्थ्यांचे योगदान ७.६९ अब्ज डॉलर्सचे आहे.

दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय तटरक्षक दलात भरती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
%d bloggers like this: