हायलाइट्स:
- दहावी उत्तीर्णांना नौदलात नोकरीची संधी
- सुमारे १२०० जागांवर भरती प्रक्रिया सुरू
- अर्जांची मुदत ७ मार्च २०२१ पर्यंत
पदाचे नाव – ट्रेड्समन मेट (Tradesman Mate)
पदांची संख्या (इस्टर्न नेवल) – ७१० पदे
वेस्टर्न नेवल – ३२४ पदे
सदर्न नेवल – १२५ पदे
एकूण पदे- ११५९
वेतन श्रेणी – १८ हजार रुपयांपासून ५६,९०० रुपये प्रति महिना (याव्यतिरिक्त अन्य भत्ते)
आवश्यक पात्रता (Indian Navy TMM Eligibility)
मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असणे अनिवार्य. या व्यतिरिक्त मान्यता प्राप्त संस्थेतून आयटीआय प्रमाणपत्र आवश्यक.
वयोमर्यादा
भरती प्रक्रियेत सामील होण्यासाठी उमेदवाराचे वय किमान १८ आणि कमाल २५ वर्षे असायला हवे. आरक्षित प्रवर्गांतील उमेदवारांना नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
दहावी, बारावी उत्तीर्णांना संधी; भारतीय नौदलात नाविक पदांवर भरती
अर्ज कसा कराल?
या भरतीसाठी भारतीय नौदलाचे अधिकृत संकेतस्थळ joinindiannavy.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल. सोमवार, २२ फेब्रुवारी २०२१ पासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. ७ मार्च २०२१ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) अर्ज करता येईल. ऑनलाइन अर्ज करण्याची थेट लिंक पुढे देण्यात आलेली आहे.
अर्जाचे शुल्क
सर्वसाधारण, ओबीसी व ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी २०५ रुपये अर्ज शुल्क आहे. अन्य प्रवर्गांसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.
भारतीय नौदलात ट्रेड्समन मेट पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड ऑनलाइन / संगणकीकृत चाचणीच्या आधारे होईल.
Indian Navy TMM Job Notification 2021 साठी येथे क्लिक करा.
Apply करण्यासाठी येथे क्लिक करा.Indian Navy Career च्या वेबसाइट वर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
वायुदलात भरती; दहावी उत्तीर्णांपासून पदवीधरांना नोकरीची संधी
NHM Maharashtra Recruitment 2021: महाराष्ट्रात नॅशनल हेल्थ मिशनमध्ये नोकरीची संधी
केंद्र सरकारी नोकरभरती; UCIL मध्ये विविध पदे रिक्त