India coronavirus cases update death discharged status update 18 april 2021


India Corona Cases Update : देशात कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. देशात दररोज नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत विक्रम नोंद होत असून मृत्यूदरातही वाढ होत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 2 लाख 61 हजार 500 नव्या कोरोना बाधितांचा आकडा समोर आला आहे. तसेच कोरोनामुळे 1 हजार 501 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात दिलासा देणारी बाब म्हणजे, देशात गेल्या 24 तासांत 1,38,423 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. शुक्रवारी 234,692 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली होती. यापूर्वी कोरोनाच्या पहिल्या लाटेत 15 सप्टेंबर रोजी सर्वाधिक 1 हजार 290 रुग्णांचा मृत्यू झाला होता. 

देशातील आजची कोरोना स्थिती : 

एकूण कोरोना बाधित रुग्ण : एक कोटी 47 लाख 88 हजार 109
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : एक कोटी 28 लाख 9 हजार 643
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण : 18 लाख 1 हजार 316
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 1 लाख 77 हजार 150
देशात आतापर्यंत लसीकरणाची आकडेवारी : 12 कोटी 26 लाख 22 हजार 590 डोस 

राज्यातही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव 

 राज्यात आज सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांची आकडेवारी धडकी भरवणारी आहे. आज  67 हजार 123 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. आज 56 हजार 783 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 30 लाख 61 हजार 174 रुग्ण बरे होऊन  घरी परतले आहेत. राज्यात 419 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 59 हजार 970 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण 6लाख 47 हजार 933 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.18 टक्के  झाले आहे.

कोरोना लसीचे उत्पादन वाढवण्यासाठी पूर्ण क्षमतेचा वापर करा; पंतप्रधानांचा प्रशासनाला आदेश

मुंबईत शनिवारी 8 हजार 811 रुग्णांची नोंद 

मुंबईत गेल्या 24 तासात  8 हजार 811 रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत आतापर्यंत 4 लाख 71 हजार 80 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 86 हजार 433 आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासनाने केलेली नियमावली, उपाययोजना यांची वस्तुनिष्ठ माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवतानाच माध्यमांनी जनजागृती करावी. साथीच्या आजाराचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन हा लढा यशस्वी करूया, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात सर्वाधिक रुग्णवाढ महाराष्ट्रात होत आहे. ही रुग्णवाढ थांबविण्यासाठी राज्य शासन अनेक उपाययोजना करीत आहे. नियमावली जाहीर केली आहे. लोकांना त्याविषयी सोप्या भाषेत माहिती देताना कोरोना नियंत्रणासाठी अनावश्यक गर्दी टाळणे, मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे या सूचनांचे पालन करणे किती आवश्यक आहे हे समजून सांगायची आवश्यकता आहे. माध्यमांनी जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

 

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *